गाझापट्टीवरून भारतात ‘ट्विटर वॉर’!

दोनच दिवसांपूर्वी पॅलेस्टिनने ४० तासांत १ हजाराहून अधिक रॉकेटचा मारा इस्राईलच्या नागरी वस्त्यांवर केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्राईलने गाझापट्टीवर रॉकेट हल्ला केल्याबरोबर भारतातील पुरोगामी, मुस्लिमधार्जिणे यांचे पित्त खवळले आहे.

104

जगात एका बाजूला कोरोनाने थैमान घातले असताना दुसरीकडे पॅलेस्टिनने इस्राईलवर रॉकेट हल्ला करून नव्याने संघर्षाला तोंड फोडले आहे. जशास तसे उत्तर देण्याची हिमंत असलेल्या इस्राईलनेही लागलीच गाझापट्टीवर रॉकेट हल्ला करून चोख उत्तर दिले. वास्तविक या संघर्षाचा तसा संबंध भारताशी येत नाही, तरीही काही तथाकथित पुरोगाम्यांना इस्राईलचे प्रत्युत्तर पचनी पडलेले नाही. त्यामुळे ही जमात एकजात सोशल मीडियावर सक्रिय झाली असून यात पॅलेस्टिनला ‘गरीब’ , ‘बिच्चारा’ दर्शवत असून इस्राईलला मात्र ‘दहशतवादी’ संबोधत एकप्रकारे खिलाफत चळवळीची पुनरावृत्ती करत आहेत.

आधी पॅलेस्टिनकडून हल्ला!

विशेष म्हणजे भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने झुंजत आहे. अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे देशात मृत्यूचे तांडव सुरू आहे. अशावेळी इस्राईलनेही भारताला बरीच मदत पुरवली आहे. अशा इस्राईलवर आता पॅलेस्टिनींनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी पॅलेस्टिनने ४० तासांत १ हजाराहून अधिक रॉकेटचा मारा इस्राईलच्या नागरी वस्त्यांवर केला, त्यातून मोठी वित्तीय आणि जीवित हानी इस्राईलची झाली. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्राईलने गाझापट्टीवर रॉकेट हल्ला केल्याबरोबर भारतातील पुरोगामी, मुस्लिमधार्जिणे यांचे पित्त खवळले आहे. त्यामध्ये भारतीय मुसलमानही आहेत, जे आता पॅलेस्टिनच्या बाजूने उभे राहून इस्राईलवर आरोप करत आहेत आणि भारत सरकारनेही तशी भूमिका घेण्याचे धडे देऊ लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नसीम खान यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून भारताने इस्राईलचा निषेध करावा, अशी मागणी केली आहे.

(हेही वाचा : ऑक्सफोर्डमध्ये हिंदू विद्यार्थी एकवटले!)

ओवैसी म्हणतात, पॅलेस्टिनी मुजाहिद्दीनला सलाम!  

एमआयएमच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर पॅलेस्टिनच्या पाठिंब्याची पोस्ट केलेली आहे. यात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा व्हिडिओ आहे. ज्यात ते म्हणतात कि, आम्ही पॅलेस्टिनच्या मुजाहिद्दीन आणि त्यांच्या आय-बहिणींना सलाम करतो, आम्हाला तुमचा त्रास पाहून आमच्या डोळ्यांत पाणीही येते आणि आत्मविश्वास वाढतो. आम्ही हे कधीच विसरणार नाही.

काँग्रेस नेते सलमान निझामी म्हणतात, आम्ही पॅलेस्टिनच्या बाजूने! 

पॅलेस्टिनी एकटे नाहीत. आम्ही सर्वांना आवाहन करतो कि, पॅलेस्टिनच्या बाजूने उभे राहावे. आम्ही पॅलेस्टिनच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करतो, असे काँग्रेस नेता सलमान निझामी म्हणाले.

शरजील उस्मानी म्हणतो बहिष्कार टाका! 

शरजील उस्मानी म्हणाला कि, पॅलेस्टिनच्या समर्थनार्थ एचपी आणि पुमा या कंपन्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाका.

स्वरा भास्कर म्हणते, इस्राईल चुकीचे करते! 

अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणते, प्रिय इस्राईल, जर भारतातील उजव्या विचारांचे लोक तुम्हाला पाठिंबा देत आहेत… याचाच अर्थ तुम्ही चुकीचे करत आहात.

काँग्रेस नेता अली मेहदी म्हणतात, अल्ला इस्राईलला नष्ट करेल! 

E1K65RfVoAUfknX

दिल्लीतील काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार, नेते अली मेहदी यांनी, अल्ला इस्राईलला नष्ट करेल, असे म्हटले. मात्र त्यानंतर मेहदी यांनी हे ट्विट डिलीट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.