आकाशात विमानांची जोरदार धडक! अपघाताची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

सौजन्य : ट्विटर

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील दल्लास येथे एअर शो दरम्यान एक मोठा विमान अपघात झाला आहे. दोन विमानांची आकाशात धडक होतानाची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या अपघाताचे भयानक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. बोईंग बी-१७ आणि बेल पी-६३ या दोन विमानांची एअर शोदरम्यान जोरदार धडक झाली.

अपघाताची दृश्य कॅमेऱ्यात कैद 

ही दोन्ही विमाने विंटेज मिलिट्री एयरक्राफ्ट असून दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील होती. CEO हँक कोट्स म्हणाले की, B-१७ मध्ये सामान्यत: ४ ते ५ लोकांचा क्रू असतो आणि P- ६३मध्ये एकच पायलट आहे, मात्र अपघाताच्या वेळी विमानात इतर किती लोक होते हे त्याने सांगितले नाही. एअर शोमध्ये स्टंट करत असताना दोन्ही विमाने हवे आदळली.

१२ नोव्हेंबर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. टेक्सासमधील दल्लासमध्ये विंटेज एअर शो सुरू होता, यावेळी हा अपघात झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ४० हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. घटनास्थळी तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन मंत्र्यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश जारी केले आहे. एअर शोमध्ये एवढी मोठी चूक कशी झाली असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here