पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौ-यावेळी घुसखोरी करणा-या दोघांना अटक; एकाकडून घातक शस्त्रात्रे जप्त

181

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) मुंबई दौरा अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. या दौ-यादरम्यान मोदींनी 38 हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्धाटन केले. परंतु या दौ-याला गालबोट लागल्याचे समोर आले आहे. पंतप्रधानांच्या दौ-यात घुसखोरी करणा-या दोघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यापैकी एकाकडून घातक शस्त्रात्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे मोदींच्या दौ-यात घातपाताचा हेतू होता का? असा सवाल उपस्थित होत आहे. कटराम चंद्रगाई कावड असे या आरोपीचे नाव असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 39 वर्षीय कटराम हा हाॅटेल आणि ट्रान्सपोर्टचा कर्मचारी असून तो भिवंडी येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

( हेही वाचा: कोरोना काळातील मनपा घोटाळ्याचे पुरावे असलेला ‘पेन ड्राईव्ह’ हाती; देशपांडेंचा गौप्यस्फोट )

अधिक तपास सुरु

मोदींच्याा सभास्थळी गस्त घालणा-या पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यावेळी त्याला थांबवून त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्याकडे स्मिथ अॅंड वॅगन स्प्रिगफिल्ड रिव्हाॅल्वहरसह चार राऊंड सापडले. त्याच्याकडे या रिव्हाॅल्वहरचा परवाना असल्यचीही माहिती मिळाली आहे. दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध बीकेसी पोलीस ठाण्यात कलम 37(1), 135 मापोका 1951 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.