सेनेगलमध्ये दोन बसेस समोरासमोर धडकल्या; 40 जणांचा मृत्यू

सेनेगल देशात दोन बसेस यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे तब्बल 40 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घ़डली आहे. अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर येथे तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

अपघाताचे कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सेनेगलमधील कॅफ्रीन भागातील ग्रिवी गावात राष्ट्रीय मार्ग क्रमांक 1 वर हा अपघात घडला आहे. यातील एका सार्वजनिक बसचे टायर पंक्चर झाल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. परिणामी पहिली बस समोरुन येणा-या दुस-या बसवर आदळली. या भीषण अपघाताचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

( हेही वाचा: भारतीय नारीशक्तीची गगन भरारी! अवनी चतुर्वेदी रचणार इतिहास; ‘एरियल वॉर गेममध्ये’ सहभागी होणारी पहिली महिला पायलट  )

घटनेचा तपास केला जाणार 

या घटनेनंतर, येथील राष्ट्राध्यक्ष मॅकी शाल यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या घटनेचा तपास केला जाणार असून आगामी काळात अशा घटना घडून नयेत म्हणून, रस्त्यावरील सुरक्षेसाठी काय करता येईल? यावर चर्चा करण्यासाठी मंत्रीमंडळ बैठक आयोजित केली जाईल, अशी माहिती मॅक शाल यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here