जम्मू- काश्मिर: ग्रेनेड स्फोटात 2 जवान हुतात्मा

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ अचानक झालेल्या ग्रेनेडच्या स्फोटात भारतीय सैन्याच्या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कॅप्टन आणि एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरचा समावेश आहे. तर, या दुर्घटनेत अन्य 5 जवान जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. मेंढर सेक्टरमध्ये ही घटना घडली तेव्हा लष्कराचे जवान ड्युटीवर होते. घटनेनंतर जखमी कॅप्टन आणि जेसीओ यांना उपचारासाठी उधमपूरला नेण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

( हेही वाचा: पक्षादेश धूडकावून द्रौपदी मुर्मू यांच्या समर्थनात मतदान होईल; आशिष शेलारांचे सूचक वक्तव्य )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here