इसिस संघटनेचे दोन दहशतवादी दोषी, शिक्षेवर होणार सुनावणी

मुस्लिम तरुणाचे माथे भडकावून त्यांना इसिस या दहशतवादी संघटनेत सामील करून सिरीयात पाठवण्यासाठी प्रवृत्त केल्या प्रकरणी गुरुवारी एनआयएन विशेष न्यायालयाने दोन दहशतवाद्यांना दोषी ठरवले आहे. या दोघांच्या शिक्षेवर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

रिजवान अहमद, मोहसीन इब्राहिम सय्यद दोघांना केलेली अटक

मालाड मालवणी येथील तीन तरुण इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी सीरिया येथे गेल्याचा प्रकार २०१५ मध्ये उघडकीस आला होता. याप्रकरणी राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता. याप्रकरणी रिजवान अहमद आणि मोहसीन इब्राहिम सय्यद या दोघांना एटीएसने अटक केली होती. हे प्रकरण नंतर एनआयएकडे सोपवण्यात आले होते. एनआयएने या प्रकरणात आणखी दोघांना अटक केली होती. देशातील मुस्लिम तरुणाची माथी भडकावून त्यांना कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तसेच या तरुणांना इस्लामिक स्टेट(इसिस) या दहशतवादी संघटनेत सामील करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

(हेही वाचा धारावीत रुग्ण संख्या शंभरी पार…)

२०१६ पासून होते तुरुंगात 

रिजवान अहमद आणि मोहसीन इब्राहिम सय्यद या दोघांनी इतर तरुणांना भारतातील सहयोगी राष्ट्रांविरुद्ध युद्ध करण्यासाठी इसिसचे सदस्य होण्यासाठी सीरिया या इस्लामिक राष्ट्रात प्रवास करण्यास प्रवृत्त केले होते. असा आरोप या दोघांविरुद्ध लावण्यात आला आहे. एनआयने या दोघांविरुद्ध भक्कम पुरावे आणि साक्षीदार गोळा करून एनआयएनच्या विशेष न्यायालयात सादर केले होते. २०१६ पासून तुरुंगात असणाऱ्या या दोघांविरुद्ध एनआयए विशेष न्यायालयात खटला सुरु होता. मंगळवारी न्यायालयाने या दोघांना दोषी ठरवले असून या दोघांच्या शिक्षेवर शुक्रवारी (आज) सुनावणी होणार आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here