एकाच नव-यासाठी दोघींनी केला ‘टॉस’, कोण ठरलं ‘बॉस’ आणि कोणाचा झाला ‘लॉस’?

झाला ना भाऊ प्रेमाचा त्रिकोण, मग नवरा-बायको होणार कोण? हे कोडं काही सुटता सुटेना. मग...

165

खेळ कोणताही असो, प्रत्येक खेळात खेळाइतकाच महत्त्वाचा असतो तो टॉस… आता टॉस जिंकला म्हणजे सामना जिंकलाच, असं काही होत नसतं. टॉस म्हणजे खेळ सुरू करण्याआधीची एक प्रथा आहे. आता लग्न म्हणजे नवा डाव किंवा आयुष्याची सेकंड इनिंग असली, तरी तो काही पोरखेळ नाही. त्यामुळे ते कोणाशी करावं हा निर्णय जर कोणी टॉस करुन घेतला तर…?

वाचायला जरा विचित्र वाटलं असेल. पण कर्नाटकातील एका गावात चक्क टॉस करुन लग्न लागलं ना बॉस…कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील सकलेशपूर तालुक्यात हा आगळावेगळा प्रकार घडला आहे.

(हेही पहाः पोलिसांनाही पडली Money Heist ची भुरळ)

झाला लव्ह ट्रँगल

सकलेशपूरमधील एक 27 वर्षीय तरुण गेल्या वर्षी शेजारच्या गावातील एका 20 वर्षीय तरुणीला भेटला. त्यानंतर त्यांचा ‘दिल का मामला’ सुरू झाला आणि ते एकमेकांना वारंवार भेटू लागले. पण सहा महिन्यांपूर्वी कहानी मे ट्विस्ट आला आणि दोघांच्या लव्ह स्टोरीत ‘वो’ आ गयी… सहा महिन्यांपूर्वी हा तरुण आणखी एका मुलीला भेटला आणि तिच्यासोबतही त्याचे प्रेमसंबंध सुरू झाले. हा तरुण आपली फसवणूक करत असल्याचे दोन्ही मुलींना माहीत नव्हते.

प्रेमाचा त्रिकोण, मग नवरा-बायको होणार कोण?

एके दिवशी त्या तरुणाच्या नातेवाईकाने त्याला एका मुलीसोबत चोरी-चोरी, छुपके-छुपके भेटताना पाहिले. त्यावेळी त्याचे हे प्रेम प्रकरण त्याच्या घरच्यांना कळले. पण त्याच्या घरच्यांकडून त्यांच्या या नात्याला विरोध करण्यात आला. त्या मुलीच्या घरच्यांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी त्याच्या घरी भेट दिली. या सगळ्याची खबर दुस-या प्रेयसीला लागली व तिच्या घरच्यांनीही त्या मुलाच्या घरच्यांना झालेल्या फसवणुकीची माहिती दिली. आता झाला ना भाऊ प्रेमाचा त्रिकोण, मग नवरा-बायको होणार कोण? हे कोडं काही सुटता सुटेना.

(हेही वाचाः कुठे आणि कसा झाला ‘पांडवपुत्र’ टोळीचा उगम?)

झाली पंचाईत, भरली पंचायत

या प्रेमाच्या त्रिकोणाची माहिती गावातील चांडाळचौकडीला मिळाली आणि ती गावभर पसरली. त्यामुळे या पंचाईतीवर तोडगा काढण्यासाठी गावात पंचायत बसली. हा पेच सोडवण्यासाठी पंच आले. दोन्ही मुलींनी आपल्याला हाच नवरा पाहिजे म्हणून पंचांकडे रिव्ह्यू मागितला. पंचांनी याबाबत मुलाला विचारले त्याचे मत विचारले असता त्याने काहीच न बोलता अंपायर्स कौल(कॉल) मागितला.

झाला प्रेमाचा करार

मग पंचांनी आपापसात बातचीत करुन एक निर्णय घेतला. दुस-यांदा पंचायत भरल्यानंतर तो तरुण आणि दोन्ही मुलींच्या कुटुंबियांना पंचायतीचा निर्णय अंतिम असेल, या करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. जर कोणाला निर्णय मान्य नसेल तर त्यांच्यापैकी कोणीही पोलिस, न्यायालयाकडे दाद मागायला जाणार नाही, असे त्या करारात नमूद करण्यात आले. तिन्ही पक्षांनी हा करार मान्य करत त्यावर सह्या केल्या.

(हेही वाचाः सार्वजनिक गणेश मूर्तींच्या आगमन व विसर्जनासाठी ‘हे’ आहेत नियम)

टॉस का बॉस कोण?

आता आला तो क्षण टॉस का बॉस कोण हे ठरवण्याचा. छापा काटा करुन कुठल्या मुलीचा काटा निघणार हे ठरवण्यात येणार होते. पंचांनी टॉस केला आणि त्यात पहिली मुलगी जिंकली. मुलगाही तिच्याशी लग्न करण्यास तयार झाला. आता हा इतका सगळा थरार झाल्यानंतर ती दुसरी मुलगी काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण त्या मुलीने विजयी वधू पक्षाला शुभेच्छा दिल्या. पण आपली फसवणूक करणा-या वराच्या एक सणसणीत मुस्कटात हाणली आणि मी तुला सोडणार नाही, अशा शब्दांत तिने त्याला ताकीद दिली.

आता ती मुलगी पुढे काय करणार हे सांगायला आम्ही ज्योतिषी नाही गड्यांनो… आणि हा काही सिरीयलचा स्क्रीन-प्ले सुद्धा नाही. त्यामुळे जास्त विचार करुन सिरीयस होऊ नका. फक्त गोष्ट एंजॉय करा…

(हेही वाचाः घरगुती गणेशमूर्तींच्या आगमन, विसर्जनासाठी महापालिकेची नियमावली जाहीर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.