नागपूरात दोन बिबट्यांचा बळी

97
नागपूर येथे बुधवारी रात्री एका बिबट्याच्या बछड्याचा चिखलात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेला सहा तास होत नाहीत तोपर्यंत दुसऱ्या बिबट्याचा नागपूर आणि जबलपूरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 44 वर वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. या दुसऱ्या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग 44 वरील वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी महामार्गावर अपेक्षित ठिकाणी पुलाखालून जाणारे रस्ते उभारा ही मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
देवलापार येथील पटगोवरी येथे बिबट्याचा बछडा अडकल्याची माहिती वनविभागाला मिळाली. साधारणत: पाचच्या सुमारास माहिती मिळताच वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. मात्र वाहतूक कोंडीमुळे पथकाला पोहोचायला दीड तास उशीर झाला. तासाभराच्या प्रयत्नानंतर बछड्याला चिखलातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र नाका तोंडात पाणी गेल्याने बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला. साधारणत: वर्षभराच्या बछड्याचा या अपघातात मृत्यू झाला.
या घटनेला सहा तास उलटत नाही तेच राष्ट्रीय महामार्ग 44 वर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला . या बिबट्याचे वय मात्र समजू शकले नाही. या महामार्गावर काही महिन्यांपूर्वीच ‘टी6’ या वाघाला वाहनाच्या धडकेत जबर जखमा झाल्या होत्या. उपचारादरम्यान वाघाचा मृत्यू झाला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.