पुण्यातील दोन व्यावसायिकांना बीए व्हेरिएंट 5ची बाधा झाल्याचे उघडकीस आले. हे दोन्ही व्यावसायिक पुणे ग्रामीण भागातून असून नुकताच दुबईला प्रवास केला होता. दोन्ही रुग्ण आता उपचारानंतर बरे झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
(हेही वाचा – 68th National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘पैठणी’चा सन्मान, ‘हा’ मराठी चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट!)
राज्यात आता 14,579 कोरोना रूग्णांवर उपचार
राज्यात शुक्रवारी 2 हजार 515 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात 2 हजार 449 कोरोना रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मुंबई, ठाणे, वसई-विरार, पुणे, सातारा आणि कोल्हापूरात प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात आता 14 हजार 579 कोरोना रूग्णांवर उपचार दिले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
आतापर्यंत 160 बीए 4 आणि 5 व्हेरिएंटचे रुग्ण
राज्यात आतापर्यंत बीए व्हेरिएंट 4 आणि 5 चे 160 रुग्ण सापडले आहे. सर्वात जास्त रुग्णसंख्या पुण्यात दिसून आले आहेत. पुण्यात 93, मुंबईत 51, ठाण्यात 5 रुग्णांना आतापर्यंत बीए व्हेरिएंट 4 आणि 5 ची बाधा झाली आहे. नागपूर आणि पालघरमध्ये प्रत्येकी 4 रुग्ण तसेच रायगडमध्ये 3 रुग्ण बीए व्हेरिएंटचे आढळून आले आहेत.
Join Our WhatsApp Community