पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन वैमानिकांचा मृत्यू

106

खराब हवामानामुळे पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटनेत ठार झालेल्या वैमानिकांची नावे मेजर इरफान बेरचा आणि मेजर राजा झीशान अशी आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमधील घटना

दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर हे पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान भागात कोसळले. घटनेची माहिती मिळताच पाकिस्तानी जवान घटनास्थळी दाखल झाले. येथील भागात तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. या हेलिकॉप्टरमध्ये नेमके किती जण होते याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान ऑगस्ट महिन्यातही या भागात दोन दुर्घटना घडल्या होत्या.

(हेही वाचा – संसार थाटण्यासाठी तिने केले असे, पण तुरूंगात रंगवतेय संसाराची स्वप्ने)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.