पुण्यात भर दुपारी गँगवार : वाळू व्यावसायिकासह २ जणांचा मृत्यू

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील हॉटेल सोनई समोर राहू (ता. दौड) येथील वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप यांच्यावर चार ते पाच जणांनी शुक्रवारी, २२ शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला. यात संतोष जगताप यांचा मृत्यू झाला, तर संतोष जगताप यांनी जखमी अवस्थेत प्रत्युत्तरात दाखल केलेल्या गोळीबारात एक हल्लेखोर ठार झाल्याचे पुढे आले आहे. तर तीन ते चार जण पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत, तसेच संतोष जगताप यांचा अंगरक्षक जखमी झाला असून त्याच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अंगरक्षकावर घातक हत्याराने हल्ला चढविला

संतोष जगताप दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनई समोर चर्चा करीत असताना रस्त्याच्या बाजूने आलेल्या चार ते पाच जणांनी संतोष जगताप व त्यांच्या अंगरक्षकावर घातक हत्याराने हल्ला चढविला, तसेच गोळीबारही केला. यात संतोष जगताप व त्यांचा अंगरक्षक गंभीर जखमी झाले तर जखमी अवस्थेत संतोष जगताप यांनी हल्लेखोरांना प्रत्युत्तर देताना गोळीबार केला, त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झाला, तर उर्वरित पळून जाण्यात यशस्वी ठरले.

(हेही वाचा : वीर सावरकरांचा नितीन राऊतांकडून अवमान ! विरोध होताच पोस्ट केली डिलीट)

संतोष जगताप यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला

जखमी संतोष जगताप यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता संतोष जगताप यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. लोणी काळभोर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here