महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा हल्ला; दोन पोलीस हुतात्मा, एक जखमी

171

महाराष्ट्र-गोंदिया छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याचं समोर आलं आहे. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये दोन पोलीस हुतात्मा झालेत तर एक जखमी झाल्याची माहिती मिळतेय.

सूत्रांच्या माहितीनुसार, ही घटना महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नाका बंदिस्त करताना झाली. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास हा हल्ला झाला. छत्तीसगड राज्याच्या हद्दीत घटना घडली असून जी महाराष्ट्र सीमेच्या चेकपोस्टपासून सुमारे ५० मीटर अंतरावर आहे. या घटनेत हुतात्मा झालेले दोन पोलीस हे छत्तीसगड पोलिसात कार्यरत होते. हा परिसर नक्षलग्रस्त असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान एका खासगी मराठी वृत्तवाहिनीला माहिती देताना नक्षलवाद विरोधी पथकाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील म्हणाले की, ‘ही घटना सोमवारी सकाळी सव्वा आठच्या आसपास घडली. छत्तीसगडच्या हद्दीत आपल्या बोर्डपासून एक किलोमीटरच्या आसपास जे चेकपोस्ट आहे, तिथे हे जवान तपास करत होते. त्यावेळेस नक्षलच्या दोन दलांनी हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार, जवानांकडे शस्त्र नसल्यामुळं नक्षलांना त्यांना सहजासहजी हल्ला करत आला. त्यामुळे या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले असून एक जवान जखमी झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता आपण छत्तीसगड पोलिसांच्या सातत्यानं संपर्कात आहे. तसंच सदर ठिकाणी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्राचे जॉईंट ऑपरेशन राबवण्यास सुरू केलं आहे. शिवाय महाराष्ट्रातही जे असे चेकपोस्ट आहेत, तिथं अलर्ट जारी केला आहे.’

(हेही वाचा – कोण आहे अमृत्सरची निमरत रंधावा? जी लढणार २०२४ ला अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.