गुजरातची बोट रत्नागिरीच्या समुद्रात बुडाली; दोन खलाशांचा मृत्यू

गुजरातची नौका रत्नागिरीजवळच्या समुद्रात बुडाल्याने दोन खलाशांचा मृत्यू असून आणखी एक खलाशी बेपत्ता झाल्याची घटना बुधवारी घडली आहे.

( हेही वाचा : विक्रोळीत २३ व्या मजल्यावरून पार्किंग लिफ्ट कोसळली, एका कामगाराचा मृत्यू )

गुजरातमधील ही नौका जयगडसमोर ८० नॉटिकल समुद्रात बुडाली. तटरक्षक दलाच्या नौका आणि हेलिकॉप्टरच्या साह्याने या खलाशांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दोन खलाशांचा मृत्यू झाला. एक खलाशी बेपत्ता झाला असून उर्वरित खलाशांना वाचवण्यात यश आले आहे. या नौकेतील बचावलेल्या आणि मृत खलाशांना घेऊन तटरक्षक दलाचे अधिकारी मिरकरवाडा बंदरात दाखल झाले. रत्नसागर नावाच्या या नौकेवर नऊजण असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र बुडालेल्यांपैकी चार जणांना वाचवण्यात यश आले असून दोघांचा मृत्यू आणि एक जण बेपत्ता अशा सात जणांचीच मोजदाद झाली आहे. हेलिकॉप्टरच्या आणि बोटीच्या साहाय्याने हे मदतकार्य करण्यात आले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here