वाघाच्या हल्ल्यात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. त्यापैकी गडचिरोलीत वनविभाग गेल्या काही महिन्यांपासून शोधत असलेल्या टी6 वाघिणीने शेतात बैल चरण्यासाठी घेऊन गेलेल्या एका माणसाला ठार केल्याचे बोलले जात आहे. तब्ब्ल 13 माणसांचा बळी घेणाऱ्या सिटी1 या वाघापाठोपाठ टी6 वाघीण शोधण्याचे वनाधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
( हेही वाचा : पासपोर्टच्या धर्तीवर होणार जात प्रमाणपत्रांची पडताळणी )
गडचिरोली येथील राजगाटा चेक या गावात शेतात बैल चरण्यासाठी घेऊन गेलेल्या सुधाकर भोयर (50) यांच्यावर वाघाचा हल्ला झाला. दुपारी तीनच्या सुमारास हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून टी6 वाघिणीचा वावर असल्याने वनविभागाने या भागात टेहाळणी वाढवली होती. गुरुवारी दुपारी सुधाकर भोयर यांच्यावर झालेल्या हल्ल्यात टी6 असल्याचे बोलले जात आहे. चंद्रपूर येथील उत्तर ब्रम्हपुरी येथे शेतात गत क्र.320 मध्ये काम करत असताना जाईबाई तुकाराम तोंडरे (55) या महिलेवर वाघाचा हल्ला झाला. दुपारी दोनच्या सुमारास हा हल्ला झाला. मात्र या हल्ल्यात संबंधित क्षेत्रात कोणत्या वाघाचा वावर होता, याची माहिती मिळू शकली नाही.
Join Our WhatsApp Community