चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील दोन वेगवेगळ्या बफर क्षेत्रात वाघीणीच्या बछड्याचा तर अंदाजे १४ ते १५ वर्षांच्या वाघीणीच्या बछड्याचा मृतदेह वनाधिका-यांना सापडला. १४ ते १५ वर्षांच्या वाघीणीचा मृतदेह बुधवारी तर मादी बछड्याचा मृतदेह वनाधिका-यांना गुरुवारी सापडला. यापैकी मादी बछड्याचा मृत्यू जंगलात वाघाने केलेल्या हल्ल्यात तर वयोवृद्ध वाघीणीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचे वनाधिका-यांनी सांगितले. दोन्ही घटनांमध्ये शिकारीचा प्रयत्न झाला नसल्याचेही वनाधिका-यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – आता ७/१२ उताऱ्यावर ‘QR’ कोड; आधारच्या धर्तीवर मिळणार ‘युनिक’ क्रमांक)
पहिली घटना
३० डिसेंबरला गुरुवारी शिवणी वनपरिक्षेत्रातील वासेरा येथे दुपारी तीनच्या सुमारास टेहाळणी पथकाला वाघाचा मृतेदह सापडला. हा भाग व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मोडतो. टी-७५ या अंदाजे १४-१५ वर्षांची वाघीणीचा मृतदेह संपूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत वनाधिका-यांना सापडला. मृतदेहावरील दात, नखे आदी अवयव व्यवस्थित आढळून आली. या घटनेत शिकार किंवा घातपाताचा प्रकार प्रथमदर्शनी दिसून येत नाही. वाघीणीचे वय वृद्धत्वाकडे झुकल्याने वयोमानामुळे तिचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तसेच क्षेत्र संचालक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले. दुस-या दिवशी गुरुवारी वाघीणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन दहन करण्यात आले.
दुसरी घटना
मोहार्ली बफर क्षेत्रातील आगरझरी येथे कक्ष क्रमांक १८९ मध्ये गुरुवारी अंदाजे ६-७ महिन्यांच्या वाघाचा बछडा टेहाळणी पथकाला मृतावस्थेत सापडला. मृत मादी बछडा हा टी ६० या वाघीणीचे असल्याचेही वनाधिका-यांच्या लक्षात आले. शर्मिली असे नाव असलेली वाघीण बफर क्षेत्रात संचार करत होती, या वाघीणीला टी ६० असेही संबोधले जाते. बछड्याच्या मृतदेहावरील जखमा पाहता नर वाघाने केलेल्या हल्ल्यात या मादी बछड्याचा मृत्यू झाला. मात्र हा हल्ला कोणत्या वाघाने केला, याबाबत निश्चित माहिती नाही, असेही वनाधिका-यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community