कोल्हापूर म्हटलं की तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल, नादच खुळा हो शब्द फेमस आहेत ते उगाच नाही. कोल्हापूरच्या कळंबा येथे नाद खुळा या शब्द प्रयोगाला साजेशी एक घटना घडली आहे. कळंबा येथे एका व्यक्तीने तब्बल २१ लाखांची बाईक घेतली. या बाईकचे दणक्यात स्वागत करताना जंगी मिरवणूकही काढली. मात्र एका रात्रीत घडलेल्या अनर्थाने २१ लाख रूपयांच्या बाईकची राख रांगोळी झाल्याचे समोर आले. अवघ्या १५ मनिटांत ही बाईक जळून खाक झाली आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
(हेही वाचा- ‘प्रतापगड’नंतर पुण्यातील चाकणच्या ‘संग्रामदुर्ग’च्या अतिक्रमणावर हातोडा!)
काय घडला प्रकार
कोल्हापूरच्या कळंबा येथील एका रहिवाशाने दिवाळीत हौसेपोटी २१ लाखांची महागडी सुपरबाईकची खरेदी केली. यानंतर दणक्यात वाजत-गाजत दणक्यात मिरवणुकही काढली. मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत २१ लाखाची दुचाकी मालकाच्या डोळ्यासमोर जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग नियंत्रणात आणली. मात्र या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या अग्नितांडवात २१ लाखांच्या बाईकसह दोन वाहनांचे देखील नुकसान झाले. या गाडीला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली. राजेश चौगले असे या तरूणाचे नाव असून दिपावलीच्या दरम्यान ही दुचाकी खरेदी केली होती. त्यानंतर या तरूणाची गावभर चर्चा देखील झाली. आगीत तब्बल ४० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचेही सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community