‘श्रीवल्ली’ सारखी दिसते म्हणत पुण्यात तरुणीची छेड

171

पुष्पा चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ सारखी दिसते म्हणत एका तरुणीची छेड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पीडितेचा भाऊ सोडविण्यास आला असता त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. ही घटना धनकवडी येथील शंकर महाराज वसाहत येथे घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी सोहेल आणि अरबाज यांच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दोघेही याच परिसरात राहत होते.

( हेही वाचा : प्रवाशांसाठी खुशखबर! रेल्वे सोडणार १८२ उन्हाळी विशेष गाड्या )

गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी घराबाहेर थांबली असता दोघे आरोपी तेथे दाखल झाले. दोघेही तिच्याकडे बघून शिट्ट्या मारु लागले. तिने दोघांना याचा जाब विचारला. तेव्हा सोहेलने तू पुष्पा चित्रपटातील हिरोईनसारखी दिसतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणत तिचा हात धरुन मिठी मारण्याचा प्रयत्न केला. तिचा भाऊ मदतीला धावून आला. यावेळी त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. पीडित मुलीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. याप्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक लोंढे करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.