धावत्या MSRTC बसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन जणांचे कापले हात!

120

बुलढाणा जिल्ह्यात शुक्रवारी भयंकर घटना घडली आहे. धावत्या एसटी बसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे रस्त्याच्या कडेला मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन तरूणांचे हात कापल्याचे समोर आले आहे. या घटनेत दोन्ही तरूणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी सुरूवातीला मलकापूरला दाखल करण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

(हेही वाचा – उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर! घराची भिंत कोसळून 9 जणांचा मृत्यू)

काय घडली घटना

मलकापूर- पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान ही घटना घडली. यावेळी काही तरूण रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीसाठी व्यायाम करत आहे. यावेळी याच मार्गावरून मलाकापूर आगाराची बस जात असताना चालकाच्या केबीनच्या मागील बाजूचा पत्रा तुटून बाहेर आलेला होता. त्यामुळे या व्यायाम करणाऱ्या तरूणांना या पत्र्याचा धक्का लागून दोन तरूणांचे हात कापले गेले. हा अपघात इतका भीषण असल्याचे सांगितले जात आहे की, यामुळे दोन्ही तरूणांचे हात अक्षरशः तुटून पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील असे या दोघांचे नाव असून त्यांच्यावर मलकापूर सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगावला उपचारांसाठी हलवण्यात आले. या अपघातानंतर बस चालकाने बस धामणगाव बढे पोलीस स्थानकात उभी केली असून बस चालक पोलीस स्थानकात आहे. दरम्यान, संतप्त जमावाने मलकापूर बस आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयात हल्लाबोल केला आहे. बसचा पत्रा तुटलेला असतानाही बस आगारातून बाहेर काढलीच कशी असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.