मोठा निर्णय! पासपोर्टवर पूर्ण नाव असेल तरच मिळणार ‘या’ देशात एन्ट्री!

युएई प्रवासासाठी पासपोर्टवर पूर्ण नाव आवश्यक

संयुक्त अरब अमिरातीत (युएई) प्रवासासाठी पासपोर्टवर पूर्ण नाव असणे आवश्यक आहे. एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाइन्सने युएईतील अधिकाऱ्याच्या हवाल्याने याबाबत निवेदन जारी केले आहे. पासपोर्टवर पूर्ण नाव नसलेल्या प्रवाशांना युएईमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सोमवारी 21 नोव्हेंबर 2022 पासून हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे.

(हेही वाचा – ITBP Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण आहात? दरमहा 69,000 पगाराच्या नोकरीची संधी)

एअर इंडिया आणि इंडिगोनो जारी केलेल्या नवीन निवेदनानुसार, प्रवाशाच्या पासपोर्टवर सिंगल नेम म्हणजे फक्त नाव असेल तर त्याला युएईमध्ये प्रवास करता येणार नाही. व्यक्तीच्या पासपोर्टवर किमान दोन शब्द असलेले नाव असणे क्रमप्राप्त असेल. उदाहरणार्थ, जर तुमच्या पासपोर्टवर फक्त समीर किंवा आमिर असे एक शब्दाचे नाव असेल, तर त्या पासपोर्टवर तुम्हाला युएईमध्ये प्रवेश मिळणार नाही. पासपोर्टवर तुमचं पूर्ण नाव असणे किंवा किमान दोन शब्द असणे गरजेच आहे. एकच नाव असणारे प्रवासी किंवा पर्यटक यांना परवानगी दिली जाणार नाही. संयुक्त अरब अमिरातीने एअर इंडिया अणि इंडिगो एअरलाइन्सला याबाबतील सूचना दिल्या आहेत की, एकच नाव असणाऱ्या प्रवाशांना युएईमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. 21 नोव्हेंबर 2022 पासून हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, स्थायी नागरिक किंवा कामासाठी येणाऱ्या नागरिकांना या निमयातून सूट देण्यात येणार आहे. इंडिगो एअरलाइनने प्रवाशांना त्यांच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधण्यास किंवा अधिक माहितीसाठी त्यांच्या वेबसाइट hwpadkpahw.bwu ला भेट देण्यास सांगितले आहे. दरम्यान, या निर्णयामागचं कारण युएई प्रशासनाने सांगितलेले नाही आहे.

(हेही वाचा – बाजारातील सॅनिटरी पॅड्समुळे महिलांना आहे कॅन्सरचा धोका, अहवालात धक्कादायक माहिती)

इंडिगो कंपनीला युएईच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पासपोर्टवर समान नाव असलेल्या आणि निवास परवाना किंवा कायमस्वरूपी व्हिसा असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. निवेदनानुसार, या नवीन नियमांमधून काही प्रवाशांना सूट देण्यात आली आहे. यामध्ये ज्या प्रवाशांकडे वैध निवासी व्हिजा आणि पासपोर्ट आहे, ज्यांच्याकडे कामानिमित्तचा व्हिसा आहे, अशा प्रवाशांना या नियमामधून सूट मिळणार आहे. त्याशिवाय ज्या व्यक्तींनी व्हिसामध्ये किंवा पासपोर्टमध्ये नावाच्या दोन्ही रकान्यांमध्ये आपलं नाव अपडेट केलं असेल. त्यांनाही या नियमातून सवलत असणार आहे. तर युएईचा हा नवा नियम “फक्त प्रवासी व्हिसा / व्हिसा ऑन अरायव्हल / एम्प्लॉयमेंट आणि तात्पुरता व्हिसा असलेल्या प्रवाशांना लागू होईल आणि हा बदल विद्यमान युएई निवासी कार्ड धारकांना लागू होणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here