वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकच्या संस्थेवर 5 वर्षांची बंदी

172

इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (IRF) या वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकच्या संघटनेवर भारत सरकारने पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, IRF ही बेकायदेशीर संस्था असून तिच्यावर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

दहशतवाद्यांचा गौरव केला जातो

IRF चे संस्थापक झाकीर नाईक यांचे भाषण आक्षेपार्ह आहे. ते त्यांच्या भाषणांतून दहशतवाद्यांचा गौरव करतात. प्रत्येक मुस्लिम हा दहशतवादी असला पाहिजे, असा दावाही झाकीर करतात, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. या अधिसूचनेत पुढे म्हटले आहे की झाकीर नाईक तरुणांना बळजबरीने मुस्लिम बनवण्यासही पाठिंबा देत आहे. तसेच, झाकीर नाईक हे हिंदू आणि हिंदू देवी-देवता आणि इतर धर्मांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करत असतात.

दहशवादी कारवायांसाठी प्रोत्साहन 

गृह मंत्रालयाने पुढे म्हटले की झाकीर नाईक हे मुस्लिम तरुण आणि दहशतवाद्यांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. गुजरात, कर्नाटक, झारखंड, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमध्ये IRF आणि त्याचे सदस्य आणि संलग्न संस्थांच्या बेकायदेशीर हालचाली दिसून आल्या आहेत.

( हेही वाचा: मराठी नवीन वर्षाला होणार मराठी भाषा भवनाची पायाभरणी )

2016 लाही बेकायदेशीर घोषित 

केंद्र सरकारचे म्हणणे आहे की ही संघटना देशाच्या सुरक्षेला धोका असलेल्या आणि देशाच्या धर्मनिरपेक्ष जडणघडणीला, शांतता आणि सौहार्दाला हानी पोहोचवणाऱ्या अशा कारवायांमध्ये गुंतली आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2016 मध्ये झाकीर नाईकच्या IRF वर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत केंद्राने अशीच बंदी घातली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.