गुजरातच्या राजकोटमधील सौराष्ट्र विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांच्या हस्ते शुक्रवारी २८ जुलै रोजी या अध्यासन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यासंदर्भात ‘हिंदुस्थान पोस्ट’शी संवाद साधताना केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर म्हणाले, स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात तुष्टीकरणाचे राजकारण सुरू झाले. ते व्होट बॅंकेवर आधारित होते. त्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य, त्यांचे बलिदान या लोकांनी दडवले, चुकीच्या धारणा पसरवल्या. इस्रायलची स्थापना १९४८ साली सार्वभौम राष्ट्र म्हणून झाली. परंतु, तिथल्या राज्यकर्त्यांनी अल्पावधीतच राष्ट्राला स्वयंसिद्ध करून दाखवले. कारण तेथे तुष्टीकरण, व्होटबँकेचे राजकारण नव्हते.
(हेही वाचा – बोरीवलीतील श्रीकृष्ण नगरमधील पुलाचे बांधकाम ‘या’ कारणामुळे रखडले)
भारतात गेल्या आठ वर्षांत मोठे परिवर्तन झाले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळात ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना होती, ती भावना आता दृढ होत आहे. सौराष्ट्र विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र सुरू होणे, ही त्याचीच परिणिती आहे. या अध्यासन केंद्रामुळे विद्यार्थ्यांना सावरकर नव्याने कळतील. सावरकरी विचारांचा प्रसार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होईल. ही एक नवीन सुरुवात आहे, जी आता परंपरेचे रूप घेईल. इतर विद्यापीठेही त्याचे अनुकरण करतील आणि येत्या काही वर्षांत देशातील प्रत्येक विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरक अध्यासन केंद्र स्थापन होईल, असा विश्वास माहूरकर यांनी व्यक्त केला.
प्रा. दीपक पटेल समन्वयकपदी
सौराष्ट्र विद्यापीठातील हे ११ वे अध्यासन केंद्र आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर चेयर, अभ्यास अने संशोधन केंद्र’, असे या अध्यासनाला नाव देण्यात आले, असून प्राध्यापक दीपक पटेल यांची समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी प्रभारी उपकुलपती गिरीश भिमाणी उपस्थित होते. ते म्हणाले, आम्ही वीर सावरकरांचे संपूर्ण जीवनचक्र अभ्यासक्रमात समाविष्ट करू. ज्या विद्यार्थ्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर संशोधन करायचे असेल, त्यांना विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र पूर्ण मार्गदर्शन करेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community