लोकसभा निवडणुकांची रंगत आता वाढू लागली आहे. मुंबई, नाशिक, पुणे या भागांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारांच्या विरोधातील घेतलेली भूमिका यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या सभांना काँग्रेसकडून मागणी वाढली आहे.
राज्यातील उरलेल्या दोन टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीमध्ये विशेषत: काँग्रेसच्या (Congress) उमेदवारांमध्ये देखील राहुल गांधी यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराच्या सभांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेच मविआमध्ये स्टार प्रचारक ठरले आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेच अधिकचा भाव खाऊन जात आहेत.
(हेही वाचा संघ आणि विहिंपच्या नेत्यांची नावे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला; Lt. Col. Purohit यांचा गौप्यस्फोट)
इंडि आघाडीचे स्टार प्रचारक जरी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी असले तरी महाराष्ट्रात मात्र काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून उद्धव ठाकरे यांच्या सभांची मागणी जास्त प्रमाणात होत आहे. उरलेल्या दोन टप्प्यांच्या मतदानाचे क्षेत्र हे मुंबई, पुणे, नाशिक हा भाग शिवसेनेच्या प्रभावातील मानला जातो. त्यामुळेच ठाकरेंच्या सभांची मागणी वाढली आहे. राज्यात तसे पाहता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या मोजक्यात सभा झाल्या. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या दोन मतदारसंघासाठी एक सभा असा रेशो राहिला आहे. परंतु शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये ज्या ठिकाणी मतदान होणार आहे ते मुंबई आणि मुंबईच्या आसपास नाशिक, पुणे भागात होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या जास्तीत जास्त सभा या भागात होणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे.
Join Our WhatsApp Community