उदित नारायण, कुमार शानू, रणवीर शोरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय योगदान पुरस्कार २०२३’ राजभवन येथे प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन धम्मदान ट्रस्ट व ‘परफेक्ट वूमन’ मासिकातर्फे करण्यात आले होते.

( हेही वाचा : भारतात पर्यटनासाठी आलेल्या महिलेमुळे पाच जणांना नवे आयुष्य; स्पॅनिश नागरिकाकडून पहिल्यांदाच अवयवदान)

राज्यपालांच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ पार्श्वगायक उदित नारायण व कुमार शानू , अभिनेते रणवीर शोरे, पर्यावरण परिषदेचे विजयराजे धमाल, दिपशिखा देशमुख, रीना त्रिवेदी, डॉ. खुशी गुरुभाई, कैलास मासूम, सीताराम गायकवाड, मोहम्मद सईद शेख व राखी राजाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे निमंत्रक गुरुभाई सुरेशभाई ठक्कर, वास्तू तज्ज्ञ बसंत रसिवासिया, डॉ गीत ठक्कर व चंद्रमणी जाधव यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here