विद्यार्थ्यांनो… जाणून घ्या UGC NET परीक्षा कधी होणार?

128

विद्यापीठ अनुदान आयोगाची सहायक प्राध्यापक पदासाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत होणार आहे. परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक लवकरच संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल, अशी माहिती यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) वतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

नेट परीक्षा जूनच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात होणार

‘डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ च्या विलीन झालेल्या चक्रांसाठी पुढील नेट परीक्षा जून २०२२ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल. तर एनटीएने अंतिम तारखा दिल्यावर वेळापत्रक जाहीर केले जाईल,’ असे कुमार यांनी ट्वीटरवर म्हटले आहे.  साधारणपणे, यूजीसी नेटची परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. मात्र कोरोनाच्या साथीमुळे पूर्ण वेळापत्रक कोलमडले आहे.

(हेही वाचा -ईडीच्या रडारवर मल्लिकार्जुन खर्गे; ‘या’ प्रकरणी चौकशी सुरु)

अशा वेळी युजीसीने दोन चाचण्यांची एकच परीक्षा घ्यायचे ठरविले आहे. परीक्षेचे वेळापत्रक घोषित झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक पदाबरोबरच कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्तीसाठीची (जेआरएफ) ही पात्रता परीक्षा आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्ष जेआरएफची मुदत असते तर प्राध्यापक पदासाठीची पात्रता आजन्म विचारात घेतली जाते.

नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मधील आकडेवारी

  • उमेदवारांची संख्या : १२ लाख ६६ हजार ५०९
  • परीक्षेला बसलेले : ६ लाख ७१ हजार २२८
  • फक्त सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र : ४३ हजार ७३०
  • जेआरएफसह प्राध्यापकपदासाठी पात्र : ९ हजार १२७
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.