UIDAI ने रद्द केले 5 लाखांहून अधिक Duplicate आधार कार्ड

‘युनिक आयडेन्टीफिकेशन एथॉर्टी ऑफ इंडिया’ अर्थात UIDAI ने देशभरातील बनावट आणि डुप्लीकेट आधार कार्डाची ओळख पटवून आतापर्यंत 5 लाख 98 हजार 999 Duplicate आधार कार्ड रद्द केले आहेत. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

अधिकृत वेबसाइट आणि आधार केंद्रांना भेट द्यावी

आधार कार्डशी संबंधित सेवा देणाऱ्या बेकायदेशीर वेबसाइट्सवरील दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रशेखर म्हणाले की, युआयडीएआयने (UIDAI) या वेबसाइट्सना नोटीस पाठवल्या आहेत. तसेच संबंधित वेबसाइट्सच्या मालकांना अशा प्रकारच्या अनधिकृत सेवा देणे बंद करण्यास सांगितले आहे. तसेच सेवा प्रदात्यांनादेखील अवैध वेबसाइट्स तात्काळ ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले आहे. जानेवारी 2022 पासून बनावट आधार कार्डची निर्मिती करणाऱ्या 11 कंपन्या बॅन करण्यात आल्या आहेत. मोबाईल नंबर पत्ता आणि फोटोपर्यंत सर्व तपशील अपडेट करण्यासाठी नागरिकांनी युआयडीएआयच्या (UIDAI)अधिकृत वेबसाइट तसेच अधिकृत आधार केंद्रांना भेट द्यावी असे आवाहन राजीव चंद्रशेखर यांनी नागरिकांना केले आहे.

( हेही वाचा : सरकार आणणार ‘Right to Repair’ कायदा; जुन्या Electronic वस्तू दुरूस्त करून देणं कंपनीला बंधनकारक )

यासोबतच युआयडीएआयने (UIDAI) डुप्लीकेट आधारच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. तसेच आधारकार्डमध्ये एक अतिरिक्त पडताळणी फिचर जोडण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच आधार पडताळणीसाठी चेहऱ्याद्वारे व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. सध्या व्हेरिफीकेशनसाठी फक्त फिंगरप्रिंट आणि डोळ्यांचे स्कॅनिंग केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here