UIDAI चा मोठा आदेश! बाल आधार कार्डमध्ये आता ‘हे’ काम करणं असणार बंधनकारक

भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) ने मुलांच्या आधार कार्ड म्हणजेच बाल आधार संदर्भात एक नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. UIDAI ने 5 ते 15 वर्षे वयाच्या मुलांसाठी आधार डेटामध्ये बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी बंधनकारक असणार असल्याचे सांगितले आहे. वय वर्षे 5 ते 15 वयोगटातील मुलांचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे अनिवार्य असून ही प्रक्रिया विनामूल्य आहे.

(हेही वाचा – मंकिपॉक्सचं नाव बदलणार! लवकरच WHO घेणार निर्णय, ‘हे’ असणार नवं नाव)

यासोबतच UIDAI ने आणखी एका ट्विटमध्ये असे सांगितले की, बायोमेट्रिक्स अपडेट केल्यानंतर मुलाच्या आधार क्रमांकात कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे पालकांना फॉर्म भरण्यासाठी आणि त्यांच्या मुलांचा बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देण्याचे आवाहनही केले आहे.

UIDAI ही सरकारी प्राधिकारण आहे. जी 12 अंकी आधारचे व्यवस्थापन आणि नियमन करते, 5 वर्षांखालील मुलांना बाल आधार कार्ड जारी करते. कार्ड विविध कल्याणकारी योजना आणि फायदे मिळवण्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे. याशिवाय जन्मापासून मुलांसाठी डिजिटल फोटो ओळखीचा पुरावा म्हणून काम करते. 5 वर्षांखालील मुलांमध्ये फिंगरप्रिंटसारखे बायोमेट्रिक्स विकसित होत नाहीत. मुलांच्या आधार कार्डमध्ये फिंगरप्रिंट आणि आयरीस स्कॅन यांसारख्या बायोमेट्रिक डेटाचा समावेश नाही. त्यामुळे सरकारने पाच वर्षांची झाल्यानंतर मुलांचे बायोमेट्रिक्स अपडेट करणे बंधनकारक केले आहे.

बाल आधार कार्डसाठी अर्ज कसा करावा?

  • UIDAI च्या अधिकृत वेबसाइट, uidai.gov.in ला भेट द्या. आधार कार्ड नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
  • मुलाचे नाव, पालकांचा नाव, पत्ता, फोन नंबर आणि इतर बायोमेट्रिक माहिती यासारखी अनिवार्य माहिती भरा.
  • सर्व माहिती पुन्हा एकदा तपासा आणि सर्व तपशील सबमिट करा. नंतर अपॉइंटमेंटच्या पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, नातेसंबंधाचा पुरावा, जन्मतारीख यासारख्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.
  • आधार एक्झिक्युटिव्ह पुढील प्रक्रिया पूर्ण करेल आणि अर्ज प्रक्रियेचा मागोवा घेण्यासाठी अॅक्नॉलेजमेंट क्रमांक देईल.
  • हे आधार कार्ड 60 दिवसांच्या आत तुमच्या पत्त्यावर पोस्ट केले जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here