भारताच्या ‘डोस’नंतर ब्रिटन सुधारले! घेतला मोठा निर्णय

ब्रिटनच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात भारत सरकारने कडवे डोस दिल्यानंतर ब्रिटनने माघार घेतली आहे.

भारतात लसीकरण मोहिमेला चांगलाच वेग आला आहे. भारताबाहेर जाणा-या नागरिकांसाठी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. पण कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांसाठी काही दिवसांपूर्वी अडचणी निर्माण झाल्या होत्या. कोविशिल्डचे दोन डोस घेतलेल्या भारतीयांना ब्रिटनमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. ब्रिटनच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात भारत सरकारने कडवे डोस दिल्यानंतर ब्रिटनने माघार घेतली आहे.

कोविशिल्ड लसीला अखेरीस ब्रिटीश सरकारने मान्यता दिली आहे. या लसीचे दोन्ही डोश घेतलेल्या भारतीयांचे आता क्वारंटाईन करण्यात येणार नसल्याचे ब्रिटीश सरकारने स्पष्ट केले आहे. 11 ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः भारतापुढे युरोपीयन युनियन नरमले… या देशांनी दिले कोविशिल्डला ग्रीन पासमध्ये स्थान)

ब्रिटनने केली क्वारंटाईनची सक्ती

प्रत्येक देशांनी आपल्या देशात येणा-या प्रवाशांसाठी काही ठराविक लसींना मान्यता दिली आहे. ब्रिटनने कोविशिल्ड लसीला मान्यता न दिल्यामुळे तिथे जाणा-या भारतीयांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ब्रिटनने कोविशिल्ड घेतलेल्या भारतीयांना आपल्या देशात क्वारंटाईन राहण्याची सक्ती केली होती. त्यामुळे यावर भारत सरकारने कठोर भूमिका घेतल्यानंतर ब्रिटीश सरकार नरमले आहे.

भारतानेही घातले होते निर्बंध

वारंवार विनंती करुन सुद्धा ब्रिटन सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे भारतानेही यूकेहून येणा-या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ब्रिटन सरकार वठणीवर आले होते व भारतासाठी प्रवासाच्या अटी शक्य तितक्या सोप्या करणार असल्याचे तेव्हा त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.

(हेही वाचाः भारतीयांसाठी कडक निर्बंध लावणा-या यूके सरकारला भारताचे चोख प्रत्युत्तर! ‘हे’ नियम केले लागू)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here