भारतीय असूनही भारताविरोधी वक्तव्य करणा-या ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा

183

ब्रिटनच्या गृहमंत्री असलेल्या भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनिवासी भारतीय असलेल्या ब्रेव्हरमन यांनी काही दिवसांपूर्वी भारतविरोधी वक्तव्य केले होते. तसेच त्यांनी भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार समझोत्याला देखील विरोध केला होता. ब्रेव्हरमन यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे ब्रिटनमध्ये नुकत्याच सत्तेवर आलेल्या लिझ ट्रस सरकारला मोठा धक्का बसला असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेव्हरमन यांच्यावर टीका

भारतीय असूनही सुएला ब्रेव्हरमन यांनी भारताविरोधी घेतलेली भूमिका आक्षेपार्ह असल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. ब्रिटनमध्ये नव्याने स्थापन झालेल्या कंजर्व्हेटिव्ह पक्षाच्या वार्षिक संमेलनात नवे पंतप्रधान ट्रस यांनी भारत-ब्रिटनमधील Free Trade Agreement पूर्णत्वास नेण्याबाबत भाष्य केले होते. त्यावेळी गृहमंत्री ब्रेव्हरमन यांनी याविरोधात भाष्य केले होते. आता त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देत ब्रिटनच्या पंतप्रधानांवर गंभीर आरोप केले आहेत.

काय आहे आरोप?

नुकतेच क्वासी क्वार्टेंग यांची अर्थमंत्रीपदावारुन हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी जेरेमी हंट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हंट यांच्याच दबावामुळे ब्रेव्हरमन यांना राजीनामा द्यावा लागला असल्याचे ब्रिटनमधील काही खासदारांचे म्हणणे आहे. ब्रेव्हरमन यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत स्थलांतरितांशी संबंधित दस्तावेज प्रकाशनापूर्वीच सहकारी खासदाराला दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.