ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांच्या सरकारमधून मागील 24 तासांत 39 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे ब्रिटनच्या पंतप्रधानांवर पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याचा दबाव वाढला. त्यानंतर बोरिस जाॅन्सन यांनी अखेर हुजूर पक्षाच्या संसदीय गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, तूर्तास जाॅन्सन पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. आता ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान पदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर आहे. ऋषी सुनक हे भारतीय उद्योजक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
ब्रिटनमध्ये राजीनाम्यांची लागली लाईन
भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला. त्यानंतर ब्रिटन सरकारमध्ये राजीनाम्याची लाट उसळली. जाॅन ग्लेन, प्रीति पटेल, ग्रॅंट शॅप्स, रिचेल मॅक्लिएन आदींनी आपले राजीनामे देत सरकारच्या अडचणीत वाढ केली. काही मंत्र्यांनी पंतप्रधान बोरिस यांच्या निवासस्थानी जात आपले राजीनामे सादर केले. तर, काहींनी त्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली होती.
( हेही वाचा …तर आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन, चित्रा वाघ यांचा इशारा )
हे आहे कारण
ब्रिटनमध्ये महागाईने मागील 40 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. बेरोजगारी वाढल्याने नाराजी वाढली आहे. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत हुजूर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. कोरोना काळात पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांच्या घरी नियमांचे उल्लंघन करुन झालेल्या पार्टीमुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community