ब्रिटन सरकार करणार बाप्पाचे अनोखे स्वागत, साकारणार सुवर्णमयी बाप्पा

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. बाप्पाच्या आगमनाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असतात. आता बाप्पाच्या आगमनाला एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला असल्यामुळे राज्यात बाप्पाच्या स्वागताची धामधूम सुरू आहे.

पण केवळ भारतातच नाही तर ब्रिटनमध्ये सुद्धा बाप्पाच्या स्वागतासाठी अनोखी तयारी करण्यात आली आहे. ब्रिटनन सरकारकडून यंदा गणपती बाप्पाच्या प्रतिमेचे गोल्ड बार तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये यंदाच्या वर्षी सुवर्णमयी बाप्पा पहायला मिळणार आहे.

(हेही वाचाः नोटा तपासून घ्या! कारण…, संसदेत सरकारने नोटांबाबत दिली धक्कादायक माहिती)

असा असणार गोल्ड बार

ब्रिटनमधील शाही टाकसाळ(Royal Mint)कडून गणपती बाप्पाच्या प्रतिमेचा छाप असलेले गोल्ड बार तयार करण्यात येणार आहेत. 20 ग्रॅम वजनाचा हा गोल्ड बार 24 कॅरटचा आहे. या गोल्ड बारची किंमत अंदाजे 1 लाख रुपये असून, सुरुवातीला केवळ 10 हजार गोलेड बार विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

अचूक चित्रण करणार

ही प्रतिमा रॉयल मिंटच्या डिझायनर एम्मा नोबेल यांनी साकारली आहे. ओल्डहॅमच्या स्वामी नारायण मंदिरातील सांस्कृतिक सल्लागार निलेश काबरिया यांच्याशी संपर्क साधून हे काम करण्यात आले आहे. ही प्रतिमा तयार करताना बाप्पाचे अचूक चित्रण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे.

(हेही वाचाः या बँकांमध्ये बंपर भरती! 6 हजारांहून जास्त जागा, असा करा अर्ज)

गेल्या वर्षी दिवाळीतही ब्रिटीश सरकारने देवी लक्ष्मीची प्रतिमा असलेले गोल्ड बार तयार केले होते. त्यावेळी पहिल्यांदाच हिंदू देवी-देवतांच्या प्रतिमा असलेले गोल्ड बार छापण्याचा प्रकार सुरू झाला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here