युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन गंगा‘ अंतर्गत आज, सोमवारी युक्रेनच्या शेजारील देशांमधून 7 विशेष नागरी विमानांनी 1,314 भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले. यामुळे 22 फेब्रुवारीपासून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी पाठविण्यात आलेल्या विशेष विमानांद्वारे आत्तापर्यंत, 17 हजार 400 पेक्षा जास्त भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. 73 विशेष नागरी उड्डाणे करून मायदेशी आणलेल्या भारतीयांची संख्या आता 15,206 झाली आहे.
10 विमानांतून 2056 प्रवाशी मायदेशी
C-17 हे भारतीय हवाई दलाचे विमान 201 प्रवाशांना घेऊन आज, सोमवारी संध्याकाळी मायदेशी परतत आहे. याआधी ‘ऑपरेशन गंगा‘ अंतर्गत भारतीय हवाई दलाने 10 विमानांतून 2056 प्रवाशांना परत आणले आहे. आजच्या विशेष नागरी उड्डाणापैकी 4 विमाने नवी दिल्ली येथे उतरविण्यात आली, तर दोन विमाने मुंबई येथे पोहोचली. एक विमान संध्याकाळी उशीरा परतण्याची शक्यता आहे. यामध्ये बुडापेस्ट येथून 5, बुखारेस्ट येथून एक आणि सुचोव्हा येथून एक विमानाचा समावेश आहे.
(हेही वाचा – “प्रत्येक राज्यात ‘एम्स’ची स्थापना करणं हे पंतप्रधानांचं स्वप्न!”)
‘ऑपरेशन गंगा’ भारतीयांच्या मदतीला
दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन गंगा’ नावाने मोठी बचाव मोहीम राबवली आहे. 22 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या बचाव कार्यांतर्गत आतापर्यंत 6200 हून अधिक लोकांना परत आणले आहे, ज्यात 10 विशेष नागरी विमानांद्वारे गुरुवारी आलेल्या 2185 व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये बुखारेस्टहून (रुमानिया) 5, बुडापेस्टहून (हंगेरी) 2, कोसिसहून (स्लोवाकिया) 1 आणि झेझोहून (पोलंड) 2 विमानांचा समावेश होता. याशिवाय भारतीय हवाई दलाच्या 3 विमानांनी आणखी काही भारतीयांना मायदेशी आणले. नागरी उड्डाणांची संख्या आणखी वाढवली जाईल आणि पुढील दोन दिवसांत विशेष विमानांद्वारे 7400 हून अधिक लोकांना मायदेशी आणले जाण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community