तिच्याकडे संपत्ती आणि सौंदर्य दोन्ही होते. ती जेव्हा सीमेवर पोहोचली तेव्हा सुरक्षा दलांच्या नजरा तिच्या ‘सौंदर्यावर’ खिळल्या होत्या. ज्याने पाहिलं तो बघतच राहिला, त्यानंतर काहीजण चौकशीच्या बहाण्याने तिच्याकडे गेले आणि त्या तपासात जे काही आढळून आलं ते पाहून सर्वांचे डोळे विस्फारले. अतीशय सुंदर दिसणा-या त्या स्त्रीकडून सुरक्षा दलांनी दोन अब्ज रुपयांची रोकड जप्त केली आहे.
तस्करीच्या आरोपाखाली अटक
युद्धग्रस्त युक्रेनमधून ही बातमी समोर आली आहे, तेथील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत माजी संसदपटू इगोर कोटवित्स्की यांची पत्नी अनास्तासिया कोटवित्स्काला हंगेरियन सीमेवर सुरक्षा दलांनी पकडले आहे. तिच्याकडून $28 दशलक्ष रोख आणि €1.3 दशलक्ष जप्त करण्यात आले. ज्याचे भारतीय रुपयात मूल्य २ अब्ज रुपये आहे. तिला तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
बातमी खोटी असल्याचा नेत्याचा दावा
इगोर कोटवित्स्की यांनी त्यांच्या पत्नीकडे मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याची ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. त्याने सांगितले की, अनास्तासिया बाळंतपणासाठी देशाबाहेर गेली आहे. त्यांचे सर्व पैसे युक्रेनच्या बँकेत असल्याचा दावा त्यांनी केला.
She knew precisely where to flee to. The wife of former Ukrainian MP Ihor Kotvitskyi declared 28 millionUSD and 1.3 million euros when entering Hungary. Kotvitskyi has faced allegations of corruption in the past. Confiscation of the money and redistribution would be a good start. pic.twitter.com/Eu1SSPErl6
— ThaiMythbuster (@thaimythbuster) March 21, 2022
( हेही वाचा: मोठी नोकरभरती होणार, पगारही वाढणार! )
गुन्हा दाखल
अनास्तासिया हंगेरियन सीमेवर सहा बॅगमध्ये पॅक केलेल्या 2 अब्ज रुपयांच्या रोख रकमेबद्दल तपशील देऊ शकली नाही. त्यानंतर हंगेरियन प्रशासनाने तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ती विलोक सीमेवरून हंगेरीत दाखल होत होती. तिला युरोपातील एका देशात आश्रय घ्यावा लागला आहे.
Join Our WhatsApp Community