Uma Bharti : राम मंदिर आंदोलनात सक्रिय असणार्‍या उमा भारती

117
Uma Bharti : राम मंदिर आंदोलनात सक्रिय असणार्‍या उमा भारती

उमा भारती (Uma Bharti) या भारतीय राजकीय नेत्या आहेत. तसेच त्या मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्रीदेखील आहेत. तरुण वयातच त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्या भारतीय जनता पक्षात सामील झाल्या. १९८४ साली त्यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना यश नाही मिळालं. (Uma Bharti)

मग १९८९ साली त्यांनी पुन्हा खजुराहो येथील सीट मिळवण्यासाठी जय्यत तयारी केली. यावेळी यश त्यांच्या पदरात पडलं. उमा भारतीजी (Uma Bharti) यांनी ती सीट जिंकली. त्यांनी जिंकलेली जागा पुढे १९९१, १९९६ आणि १९९८ सालच्या निवडणुकांमध्येही त्यांनी टिकवून ठेवली. त्यांनी भोपाळची जागा जिंकून संपूर्ण मतदार संघ स्वतःकडे वळवला. (Uma Bharti)

(हेही वाचा – IPL 2024 SRH vs RR : हैद्राबादचा एका धावेनं विजय आणि आयपीएलमधील आणखी काही विक्रम)

उमा भारती यांनी ‘या’ विभागांमध्ये केले काम 

उमा भारती (Uma Bharti) यांचा जन्म ३ मे १९५९ रोजी झाला. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रालयातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्म मध्ये क्रीडा मंत्रालय, युवा व्यवहार आणि पर्यटन क्षेत्रात, वेगवेगळ्या राज्यांमध्ये तसेच मंत्रीमंडळांमध्ये पोर्टफोलिओ आणि कोळसा खाणी विभागांमध्ये काम केले आहे. २०१४ साली नरेंद्र मोदीजी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर उमा भारतीजी यांना गंगा पुनरुज्जीवन, नदी विकास आणि जलसंपदा मंत्री या पदावर नियुक्त करण्यात आले होते. हे पद त्यांनी २०१४ ते २०१७ सालादरम्यान सांभाळले. (Uma Bharti)

१९८० आणि १९९० च्या दशकामध्ये विश्व हिंदू परिषदेने राम जन्मभूमीसाठी केलेल्या आंदोलनामध्ये उमा भारतीजी (Uma Bharti) यांनीही सहभाग घेतला होता. बाबरी ढांचा पाडण्याच्या वेळी त्या तिथे उपस्थित होत्या. त्या घटनेदरम्यान त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपांच्या संदर्भात सीबीआय न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. (Uma Bharti)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.