उमेश कोल्हे यांचे मारेकरी तबलिगी जमातीचे कट्टरपंथी, NIAच्या आरोपपत्रात उल्लेख

100
अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपी हे तबलिगी जमातीचे कट्टरपंथी सदस्य असून त्यांनी सामाजिक कार्यकर्ते इरफान खान आणि मौलवी मुशफीक अहमद यांच्या सांगण्यावरून उमेश कोल्हे यांचे हत्याकांड घडवून आणण्यात आले होते असे एनआयएने  न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
अमरावती येथे औषधाचे दुकान चालवणारे उमेश कोल्हे हे फार्मासिस्ट होते. २१ जून रोजी कोल्हे मोटारसायकलवरुन जात असताना तीन जणांनी त्यांना वाटेत अडवून धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करून गळा कापून त्यांची हत्या केली होती. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला कोल्हे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठींबा दिल्याच्या कारणावरून हे हत्याकांड घडवून आणण्यात आले होते.
राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) या हत्याकांडाचा तपास करीत आहे. या हत्याकांडाप्रकरणी एनआयएने ११ जणांना अटक केली आहे. दरम्यान एनआयएने शुक्रवारी या अकरा जणांविरुद्ध एनआयए विशेष न्यायालयात आरोप पत्र दाखल केले आहे. उमेश कोल्हे यांचे मारेकरी हे तबलिगी जमातीचे कट्टरपंथी सदस्य असून ही अकरा जणांची टोळी अत्यंत क्रूरतेच्या विचारसरणीची टोळी आहे. या टोळीने उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर २८ जून रोजी राजस्थानमधील उदयपूर कन्हैया लाल या टेलरचा शिरच्छेद केला होता.
मोहम्मद पैगंबरबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांना समर्थन देण्यावरून हे हत्याकांड या टोळीने घडवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे, एनआयएने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. उमेश कोल्हे यांनी १९ जून रोजी एका व्हाट्सअॅप ग्रुपवर नुपूर शर्मा यांना समर्थन दर्शवणारी पोस्ट टाकली होती.  या पोस्टचा स्क्रीन शॉट काढून इरफान या आरोपीने कलिम इब्राहिम या ग्रुप वर टाकला आणि हत्येचा कट शिजवण्यात आला, असे आरोपपत्रात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.