जगासाठी धोकादायक ठरलेली अल- कायदा ही संघटना पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. आता या अल-कायदाची वक्रदृष्टी भारताचे नंदनवन काश्मीरकडे असल्याची माहिती मिळत आहे. भारताच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
अल- कायदाची भारतीय उपखंडातील संघटना क्यूआयएसने आपल्या नवा- ए- अफगाण जिहाद या मासिकाचे नाव बदलून नवा- ए- गजवाए -हिंद असे ठेवले आहे. अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर, दहशतवाद्यांचा एक हेतू पूर्ण झाला. आता ते भारत आणि काश्मीरकडे लक्ष केंद्रीत करत असल्याचे यावरुन स्पष्ट होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
अमली पदार्थांची तस्करी वाढली
तालिबानी सत्तेकडे आंतरराष्ट्रीय उत्पन्नाचे स्त्रोत फार कमी आहेत. मात्र, अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणात हेराॅईन व इतर अमली पदार्थांच्या तस्करीतून तालिबानला प्रचंड पैसा मिळत आहे.
( हेही वाचा: सहा मुलांना विहिरीत फेकले; रागाच्या भरात महाडमध्ये आईचे कृत्य )
अफगाणिस्तानातील अस्तित्व जगासाठी चिंताजनक
- अल- कायदा आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटना 2023 पर्यंत तरी आंतरराष्ट्रीय हल्ले करण्यास सक्षम नाहीत.
- मात्र, अफगाणिस्तानच्या भूमीत असलेले त्यांचे अस्तित्व जगासाठी चिंतेचा विषय असल्याचे अहवालात म्हटले आहे.