दिल्लीत निर्माणाधीन इमारत कोसळली, तिघे ढिगा-याखाली अडकले, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

राजधानी दिल्लीत एक मोठा दुर्घटना घडल्याचे वृ्त्त समोर आले आहे. दिल्लीत एक निर्माणाधीन इमारत कोसळली आहे. दिल्लीच्या आझाद मार्केट परिसरात शीश महाल इथे या इमारतीचे काम सुरु होते. मात्र ही इमारत कोसळून आतापर्यंत तिघांचा मृ्त्यू झाला आहे. तर पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. काही जण या इमारतीच्या ढिगा-याखाली गाडले गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.

अग्नीशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ढिगा-याखाली गाडल्या गेलेल्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दोन मजूर जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. सकाळी आठ वाजता ही दुर्घटना घडली.

( हेही वाचा: साता-यातील शिवसेनेचा युवा नेता शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सामील )

शाळकरी मुले दबली गेल्याची भीती

धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी ही दुर्घटना झाली त्यावेळी काही विद्यार्थी या मार्गावरुन शाळेत जात होते. त्यामुळे काही विद्यार्थीही या इमारतीच्या ढिगा-याखाली दबले गेले असण्याची शंका, एका प्रत्यक्षदर्शीने व्यक्त केली आहे. इमारतीच्या बांधकामासाठी 15 मजूर या ठिकाणी काम करत होते, अशीही माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here