“मैं भाई के घर से बोल रहा हूं, तेरे को फ्रॉम कराची से ही रॉकेट मारुंगा,” परमबीर सिंग आणि इतर पोलिस अधिकारी यांच्यावर मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणी, फसवणुकीच्या गुन्ह्यात अंडरवर्ल्डच्या भाईची एंट्री झाली आहे. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या हाती एक ऑडिओ क्लिप लागली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती संजय पुनामिया आणि दुसरी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू शार्प शुटर छोटा शकील असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.
पोलिसांच्या हाती ऑडिओ क्लिप
जुहू पोलिस ठाण्यात श्यामसुंदर अग्रवाल याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्यामसुंदर अग्रवाल याला अटक होऊ नये, तसेच मोक्का अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी पोलिस अधिकारी यांनी कोट्यावधी रुपये उकळल्याचा आरोप श्यामसुंदर अग्रवाल याने मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. या गुन्ह्याचा विस्तार आणि गंभीरता तसेच या गुन्ह्यातील आरोपी पोलिस अधिकारी असल्यामुळे या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक(एसआयटी) बनवण्यात आले आहे. या तपासात एसआयटीच्या हाती एक ऑडिओ क्लिप लागली आहे. जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्यापूर्वीची ही ऑडिओ क्लिप असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः परमबीर यांच्यावरील ‘त्या’ आरोपांचा असा होणार तपास)
दोनदा आला धमकीचा फोन
संजय पुनामिया आणि श्यामसुंदर अग्रवाल यांच्यात व्यवसायिक वाद असून, या वादातून संजय पुनामियाला गँगस्टर छोटा शकील याने फोनवरुन धमकी दिल्याचे समोर आले आहे. ही धमकी नोव्हेंबर ते डिसेंबर २०१६च्या दरम्यान देण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये दुसरी धमकी देण्यात आली असल्याचे समजते. श्यामसुंदर अग्रवालच्या सांगण्यावरुन छोटा शकील याने ही धमकी दिल्याच्या संशयावरुन, संजय पुनामिया याने जुहू पोलिस ठाण्यात श्यामसुंदर अग्रवाल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतरच त्यात परमबीर सिंग, डिसीपी अकबर पठाण आणि गुन्हे शाखेच्या इतर अधिका-यांनी या गुन्ह्यात हस्तक्षेप केला होता.
एसआयटीच्या हाती लागलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज आणि फोन नंबर हा छोटा शकीलचा असल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे. मात्र मोक्का न्यायालयात छोटा शकीलच्या आवाजाचे काही नमुने आहेत, त्याच्याशी हे संभाषण जुळवून बघितले जाईल, असे एसआयटीच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
(हेही वाचाः परमबीर सिंग यांच्यावर पुन्हा नवीन गुन्हा दाखल! अडचणी वाढणार)
काय आहे धमकी?
संजय पुनामिया : हॅलो
छोटा शकील : हॅलो, संजय बोल रहा है?
संजय पुनामिया : हां जी, संजय बात कर राहा हूं
छोटा शकील : पहचाना तुने?
पुनामिया : जी…
शकील : तो तुने श्याम को अंदर क्यूं कराया ?
पुनामिया: मैने थोडी कंप्लेंट कराया है
शकील : मै भाई के घर से बात कर रहा हूं… तेरेको इधर, फ्रॉम कराची से रॉकेट मारुंगा
पुनामिया : आप थोडा तमीज से बात कर सकते हो ना?
शकील : मेरे को तमीज शिखायेंगे तू? औकात मे आजा , मुंबई नॉर्मल होगी तो तेरे को फिर से ठोकते है
नोव्हेंबर २०२० मध्ये झालेले संभाषण
पुनामिया : हॅलो
शकील : हां संजय… संजय दत्त का छोटा भाई
पुनामिया : हॅलो
शकील : हां बेटा तू संभाल जा
पुनामिया : मै कर रहा हू सेटलमेंट मुझे दो-चार दिन का टाइम दो, ऐसा आप एकदम क्यूं परेशान कर रहे हो मुझे?
शकील : नही नही नही नही …. देखो एक बात क्लिअर बताओ, पाकिस्तान का तो तुझे पता है ना .. क्या है पाकिस्तान?
पुनामिया : अरे मुझे क्या करना है कौन हिंदुस्थान, मे है कौन पाकिस्तान में हैं
शकील : इधर बॉम्ब बांधेगा उधर जायेगा, उडा देंगे तेरेको, खत्म हो जायेगी बात
पुनामिया :अरे मै आपको कुछ बोल रहा हूं
शकील : तू आराम से सेटल कर आज रात तक. मुझे बता फोन करके समझ गया
(हेही वाचाः ‘नंबर १ साहेब’ देशमुख नसून परमबीर सिंग! अनिल देशमुखांच्या वकिलाचा दावा)
काय आहे गुन्हा?
मरिन ड्राईव्ह पोलिसांनी श्यामसुंदर अग्रवाल या बांधकाम व्यवसायिकाच्या तक्रारीवरुन बांधकाम व्यवसायिक संजय पुनामिया आणि सुनील जैन या दोघांना खंडणी, फसवणूक, बळजबरीने जमीन बळकावणे आणि बोगस दस्तावेज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन, अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत शिंदे आणि गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी, असे एकूण आठ जणांचे आरोपी म्हणून नाव आहे.
Join Our WhatsApp Community