गेल्या वर्षात कोरोना महामारीने सर्वच क्षेत्रातील लोकांचा रोजगार गेला होता. दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात लॉकडाऊन दरम्यान 150 कोटी लोकांना रोजगार दिला. जवळपास 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात सरकारने 150 कोटी लोकांना नोकऱ्या दिल्याचा दावा केंद्राने दिला होता. मात्र हा दावा फोल ठरल्याचे एका अहवालावरून समोर आले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने आकडेवारी जारी करून धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. या अहवालानुसार, डिसेंबर 2021 मध्ये बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर 2021 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर 7.91 टक्क्यांच्या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
असा वाढला बेरोजगारीचा दर
नोव्हेंबर महिन्यात बेरोजगारीचा दर 7 टक्के होता. बेरोजगारीचा हा आकडा ऑगस्ट महिन्यांनंतरचा उच्चांक ठरला आहे. त्यावेळी बेरोजगारीचा दर 8.3 टक्के होता. आकडेवारीनुसार, शहरांमधील बेरोजगारीचा दर डिसेंबरमध्ये 9.30 टक्के होता, जो नोव्हेंबर 2021 मध्ये 8.21 टक्के होता. तर आता डिसेंबर 2021 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर 7.91 टक्क्यांवर पोहोचला आहे.
(हेही वाचा-राज्यातील 12 जिल्ह्यांतून जाणारा ‘समृद्धी महामार्ग’ प्रगतीसाठी ‘बुस्टर डोस’! वाचा वैशिष्ट्यं)
ग्रामीण भागात किती बेरोजगारी?
शहरात बेरोजगारीचे प्रमाण वाढते आहेच, याशिवाय जर ग्रामीण भागाबद्दल सांगायचे झाले तर येथील बेरोजगारीचा दर 7.28 टक्के होता, जो मागील महिन्यात 6.44 टक्के होता. CMIE चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी असे सांगितले की, डिसेंबर 2021 मध्ये रोजगार वाढला आहे, परंतु नोकरी शोधणाऱ्यांची संख्या त्यापेक्षा जास्त आहे. सुमारे 83 लाख अतिरिक्त लोक नोकरीच्या शोधात होते. मात्र, केवळ 40 लाख नोकरी शोधणाऱ्यांनाच रोजगार मिळाला.
Join Our WhatsApp Community