भाईजान… दुसरा निकाह करताय? जाणून घ्या उच्च न्यायालयाचा आदेश!

135

मुस्लिम पुरुषाने दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीसोबत सहवास करण्यास किंवा वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडण्यास नकार देणे हे कुराणाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. असे केरळ हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. दुसर्‍या महिलेसोबत विवाह झाल्यास, पतीने दोन्ही पत्नींना समान वागणूक देणे गरजेचे आहे. असे निरीक्षण न्यायमूर्ती ए. मोहम्मद मुस्ताक आणि सोफी थॉमस यांच्या खंडपीठाने नोंदवले आणि घटस्फोट घेण्यास मान्यता दिली.

दोन्ही पत्नींना समान वागणूक द्या

पहिल्या पत्नीसह वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडण्यास नकार देणे म्हणजे कुराणच्या आदेशाचे उल्लंघन आहे, पतीने एकापेक्षा जास्त लग्न केल्यास दोन्ही पत्नींना समान वागणूक देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात, एका महिलेने दाखल केलेल्या अपीलावर हा निर्णय देण्यात आला आहे. ऑगस्ट 1991 मध्ये या जोडप्याचे लग्न झाले आणि नंतर त्यांना तीन मुले झाली. मात्र, पती परदेशात असताना त्याने दुसरा विवाह केला.

( हेही वाचा : पाकच्या बोटीतून जप्त केले तब्बल ४०० कोटींचे हेरॉईन! )

उच्च न्यायालयाने या चार कारणांचा विचार केला

1. कलम 2(ii) नुसार, पतीने दोन वर्षांच्या कालावधीसाठी तिची देखभाल करण्यात दुर्लक्ष केले किंवा पती देखभाल करण्यात अयशस्वी झाला.

परदेशात असताना पतीने अनेक वेळा पहिल्या पत्नीच्या खात्यात पैसे पाठवले होते असे न्यायालयीन निरीक्षणात आढळले.

2. कलम 2(iv) नुसार, पती तीन वर्षांच्या कालावधीसाठी त्याच्या वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात अयशस्वी ठरला आहे.

अपीलकर्त्या महिलेने दावा केला की, पतीने 2014 मध्ये तिला भेटणे बंद केले होते. पत्नीने त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्याने दुसरे लग्न केले असल्याचे पतीने स्पष्ट केले. परंतु या जोडप्याला तीन मुले असल्यामुळे न्यायालयाने पतीच्या युक्तिवादावर विश्वास ठेवला नाही.

3. कलम 2(viii)(a) नुसार, पती तिच्याशी क्रूरतेने वागतो, म्हणजे- (अ) सवयीने तिच्यावर अत्याचार करतो किंवा वर्तनामुळे तिचे जीवन दयनीय होते.

घटस्फोटाची याचिका दाखल करण्यापूर्वी हे जोडपे पाच वर्षे एकत्र राहत नसल्याने न्यायालयाने शारीरिक किंवा मानसिक क्रूरतेचा दावा फेटाळून लावला.

4. कलम 2(viii)(f) नुसार, पती तिच्याशी क्रूरतेने वागतो, म्हणजे जर त्याला एकापेक्षा जास्त बायका असतील, तर तो कुराणच्या आदेशानुसार तिला समान वागणूक देऊ शकत नाही. त्यामुळे न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश धुडकावून लावत त्यांना घटस्फोट दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.