ब्रजवासी लाल (B.B. lal) हे भारतीय लेखक आणि पुरातत्वशास्त्रज्ञ होते. ते १९६८ ते १९७२ पर्यंत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) चे महासंचालक होते आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज, शिमलाचे संचालक म्हणून काम केले आहे. लाल यांनी युनेस्कोच्या विविध समित्यांवरही काम केले आहे.
ब्रजवासी लाल (B.B. lal) यांचा जन्म २ मे १९२१ मध्ये झाशी येथे झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. अभ्यासानंतर त्यांना पुरातत्वशास्त्रात रस निर्माण झाला आणि १९४३ मध्ये, मॉर्टिमर व्हीलर या अनुभवी ब्रिटीश पुरातत्वशास्त्रज्ञाच्या हाताखाली उत्खननात प्रशिक्षणार्थी बनले.
(हेही वाचा भारतात काँग्रेसचे कमकुवत सरकार येण्यासाठी पाकिस्तान प्रार्थना करतेय; PM Narendra Modi यांचा घणाघात)
हे उत्खनन तक्षशिलापासून सुरू झाले आणि नंतर हडप्पासारख्या ठिकाणी समाप्ती झाली. त्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून काम केले. १९६८ मध्ये त्यांना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी, शिमला येथे संचालक म्हणूनही काम केले.
त्यांच्या २००२ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द सरस्वती फ्लोज ऑन’ या पुस्तकात त्यांनी आर्य आक्रमण/स्थलांतर सिद्धांत नाकारला. राम मंदिरातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. बाबरी मशिदीच्या खांबांना जोडलेले, बारा दगडी खांब होते, ज्यात विशिष्ट हिंदू आकृतिबंध आणि बांधणी होती, त्याचबरोबर हिंदू देवतांच्या आकृत्याही होत्या. हे खांब मशिदीचा अविभाज्य भाग नाहीत, असे मत त्यांनी (B.B. lal) नोंदवले होते. त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
Join Our WhatsApp Community