सिंहगडच्या कोसळलेल्या कड्याखाली चिरडून पुण्यातील गिर्यारोहकाचा मुत्यू

निधड्या मावळ्यांनी खोल दरीतून मध्यरात्री मुत्युदेह बाहेर काढला.

104

सिंहगड किल्ल्याच्या कल्याण दरवाजाच्या बुरुजा जवळ  शनिवारी सकाळी कोसळलेल्या दरडीखाली चिरडून पुण्यातील गिर्यारोहकाचा दुर्देवी मृत्यू झाला. या गिर्यारोहकाचे नाव हेमंत धीरज गाला (वय ३१, रा. मित्र मंडळ चौक, पुणे) यांचा दुर्दैवी मुत्यू झाला आहे. शनिवारी मध्यरात्री स्थानिक कार्यकर्त्यांनी घनदाट जंगलातील दिडशे फूट खोल दरीत उतरून दोराच्या सहाय्याने हेमंत याचा मुत्यूदेह बाहेर काढला.

निष्णात गिर्यारोहक म्हणून हेमंत प्रसिद्ध

हेमंत याच्या मृत्यूने गाला कुटुंबासह त्याच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. हेमंत हा एकलुता एक मुलगा होता. त्याच्या मागे आई, वडील, बहिण असा परिवार आहे. तो अविवाहित होता. हेमंत याला ट्रेकिंग, गिर्यारोहणाची लहानपणापासून आवड होती. निष्णात गिर्यारोहक म्हणून प्रसिद्ध होता. त्याने राज्यातील गडकोट, सुळके, दुर्गम किल्ले सर केले होते. हिमालयातही त्याने ट्रेकिंग केले होते. ट्रेकिंग स्पर्धेत त्याने मोठे यश मिळवले होते.

(हेही वाचा – आनंद दिघे माझ्यामुळे ‘धर्मवीर’ झाले, राऊतांचे खळबळजनक विधान)

ट्रेकिंग स्पर्धेदरम्यान घडली दुर्घटना 

सिंहगड एथिक्स ट्रेकिंग स्पर्धेत हेमंत गाला याच्यासह राज्यभरातील तीनशे ट्रेकर्स सहभागी झाले होते. दरड कोसळल्याच्या घटनेनंतर तो बेपत्ता असल्याचं लक्षात आलं. हवेली पोलीस ठाण्याचे अमंलदार रामदास बाबर म्हणाले, हेमंत गाला हा अनुभवी गिर्यारोहक होता. त्याने  ट्रेकिंग स्पर्धेच्या २२ किलोमीटर अंतराच्या गटात  सहभाग घेतला होता. गडाच्या पायथ्याशी आतकरवाडी येथून शनिवारी सकाळी सहा वाजता स्पर्धा सुरू झाली. सिंहगड ते अवसरवाडी , कल्याण दरवाजा मार्गाने हेमंत ट्रेकिंग करत होता. सर्व स्पर्धेकात हेमंत हा बराच अंतर पुढे होता. हेमंत हा सकाळी कल्याण दरवाजा खालील पायीं मार्गाने गडावर चढाई करत असताना अचानक कल्याण दरवाजाच्या बुरूजाच्या  शेजारील कड्याची दरड  कोसळली. त्याखाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.