Budget 2023: ‘या’ शब्दांचा अर्थ जाणून घ्या, तुम्हाला अर्थसंकल्प समजण्यास होईल सोपा

119

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) बुधवारी, सकाळी ११ वाजल्यापासून लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात केली आहे. नेहमीप्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पाकडून (Budget 2023) संपूर्ण देशाच्या अपेक्षा आहेत. अर्थसंकल्पात अनेक घोषणा होतील. नवीन व्यवस्था जाहीर होतील, पण ते सर्वांना समजलेच पाहिजे असे नाही. कारण अर्थसंकल्प सादर करताना अनेक अवघड शब्दांचा वापर केला जातो. त्यामुळे बरेच लोकं याकडे दुर्लक्ष करतात. पण हे शब्द अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे अर्थसंकल्पातील अशाच अवघड शब्दाचा अर्थ जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला अर्थसंकल्प सहज समजेल.

फिस्कल सरप्लस

फिस्कल सरप्लसचा अर्थ आर्थिक नफा असा आहे. म्हणजे सरकारने जास्त कमावले आणि कमी खर्च केले याला फिस्कल सरप्लस असे म्हणतात.

फिस्कल डेफिसिट

फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट. जेव्हा सरकारचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असतो, तेव्हा त्याला फिस्कल डेफिसिट म्हटले जाते.

रेव्हेन्यू डेफिसिट

रेल्वेन्यू डेफिसिट म्हणजे महसूल तूट. जेव्हा सरकार आपले कमाईचे लक्ष्य गाठू शकत नाही तेव्हा महसूल तूट होते.

टॅक्स

टॅक्स हा शब्दाचा अर्थ बहुतेक जणांना माहित असेल. कारण अनेकजण टॅक्स भरतात. टॅक्स म्हणजे कर. यामध्ये डायरेक्ट टॅक्स म्हणजे प्रत्यक्ष कर आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे अप्रत्यक्ष कर असे दोन प्रकार असता. जेव्हा सरकार लोकांकडून थेट आयकर, मालमत्ता कर, कॉर्पोरेट कर इत्यादी स्वरूपात कर घेते तेव्हा त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात. तसेच सरकार सामान्य माणसांकडून अप्रत्यक्षपणे उत्पादन शुल्क, सेवा शुल्क, कस्टम ड्युटी इत्यादींच्या स्वरूपात कर वसूल करते त्याला अप्रत्यक्ष कर म्हणतात.

(हेही वाचा – Budget 2023: अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्सह निफ्टीची उसळी)

एक्साइज ड्यूटी

एक्साइज ड्यूटी म्हणजे उत्पादन शुल्क. देशात बनवलेल्या उत्पादनांवर आकारल्या जाणाऱ्या कराला उत्पादन शुल्क म्हटले जाते. आता फक्त दारू, पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क आकारले जाते, उर्वरित जीएसटीमध्ये समाविष्ट केले गेले आहेत.

कस्टम ड्यूटी

कस्टम ड्यूटी म्हणजेच सीमा शुल्क. देशाबाहेर केलेल्या व्यवसायावर म्हणजेच आयात-निर्यातीवर सीमा शुल्क आकारले जाते.

जीएसटी

जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर. वस्तू आणि सेवांवर आकारल्या जाणाऱ्या कराला जीएसटी म्हणतात, तो अप्रत्यक्ष कर आहे.

कॉर्पोरेट टॅक्स

कंपन्या, कॉर्पोरेट्स आणि फर्मवर आकारल्या जाणाऱ्या कराला कॉर्पोरेट टॅक्स म्हणतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.