Union Budget 2024-25 Analysis : ‘अर्थसंकल्पातील इन्डेक्केशनचा प्रस्ताव मागे घेण्याची शक्यता’ 

Union Budget 2024-25 Analysis : अर्थसंकल्प सामान्य लोकांना समजून सांगण्यासाठी अर्थसंकेत आणि हिंदुस्थान पोस्टनी आयोजित केला विश्लेषणात्मक कार्यक्रम 

479
Union Budget 2024-25 Analysis : ‘अर्थसंकल्पातील इन्डेक्केशनचा प्रस्ताव मागे घेण्याची शक्यता’ 
Union Budget 2024-25 Analysis : ‘अर्थसंकल्पातील इन्डेक्केशनचा प्रस्ताव मागे घेण्याची शक्यता’ 

मागच्या २३ जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प संसदेसमोर सादर केला. अर्थसंकल्पाची भाषा ही बरीचशी शासकीय आणि त्यामुळे लोकांना नीट समजणारी नसते. त्यासाठी लोकांना सोप्या शब्दांत अर्थसंकल्पातील प्रस्तावांचा अर्थ समजावून सांगावा आणि त्यातून लोकांशी निगडित होणारे बदलही त्यांना सांगावेत यासाठी ‘हिंदुस्थान पोस्ट’ आणि ‘अर्थसंकेत’ यांच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील मादाम कामा सभागृहात एक विश्लेषणात्मक कार्यक्रम आयोजित केला होता. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. (Union Budget 2024-25 Analysis)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लक्ष्य सेनची उपांत्य फेरीत धडक )

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय  स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe) यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. तसेच मान्यवरांचा सत्कार केला, तर अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे (Dr. Amit Bagwe) यांनी कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केली. अर्थसंकल्पात कर प्रणालीत झालेले महत्त्वाचे बदल आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांतील बदलांचा आपल्यावर होणारा परिणाम यावर कार्यक्रमात भर देण्यात आल्याचं डॉ. बागवे यांनी स्पष्ट केलं. (Union Budget 2024-25 Analysis)

त्यानंतर लेखापाल अनिकेत कुलकर्णी (Aniket Kulkarni)  यांनी दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील वाढलेला कर आणि मालमत्तेच्या विक्रीनंतर मिळणारा इन्डेक्सेशनचा फायदा रद्द होणं याविषयी माहिती उपस्थितांना दिली. ‘सध्या अर्थसंकल्पात मालमत्ता विक्रीनंतर मिळणाऱ्या इन्डेक्सेशनच्या फायद्यावर बोललं जात आहे. हा फायदा प्रस्तावित अर्थसंकल्पात रद्द होणार आहे. पण, सरकारने अर्थसंकल्पानंतर ज्या लोकांकडून यावर मतं मागवली. त्यात निम्म्या लोकांनी इन्डेक्सेशन रद्द होऊ नये यासाठी मत नोंदवलं आहे. त्यामुळे इन्डेक्सेशनवरील निर्णय मागेही घेतला जाऊ शकतो,’ अशी शक्यता व्यक्त केली. त्याचबरोबर सध्याचे भांडवली नफ्यातील करांमधील बदलही त्यांनी विस्ताराने सांगितले. (Union Budget 2024-25 Analysis)

(हेही वाचा- Kiran Pawaskar : उबाठाच्या राज्यात जनता वाऱ्यावर अन् लाडका मुलगा योजना जोरावर)

‘शेअर बाजार किंवा कुठल्याही ट्रेडिंगमध्ये कार्यरत असलेल्या लोकांना कमी मुदतीच्या भांडवली नफा आता आधीच्या १५ टक्क्यांच्या ऐवजी २० टक्क्यांवर आणण्यात आला आहे. तर दीर्घकालीन भांडवली नफाही २० टक्क्यांवरून १२.५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. घरं, सोनं यासारखी कौंटुंबिक मालमत्ता विकायची असेल तर त्यावर या बदलांचा परिणाम होणार आहे. इन्डेक्सेशन रद्द झालं तर ज्या किमतीला तुम्ही तुमची मालमत्ता विकाल, त्या सगळ्या किमतीवर दीर्घकालीन भांडवली नफा भरावा लागणार आहे. त्यामुळे मालमत्ता विकताना लेखापालाचा सल्ला घेऊन तो व्यवहार करा,’ असा सल्ला अनिकेत कुलकर्णी यांनी दिला. कारण, काही बाबतीत गुंतवणुकीच्या माध्ममातून हा दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील कर वाचवता येतो. त्याची माहिती घेऊन करात बचत करता येते. (Union Budget 2024-25 Analysis)

लेखापाल अंकुर जैन (Ankur Jain) यांनी उद्योजकांसाठी अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदींची माहिती उपस्थितांना दिली. ‘स्टार्टअप हा नवीन उद्योजकांसाठीचा सध्याचा मार्ग आहे. आणि ते सुरू करताना एंजल गुंतवणूक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अशावेळी एंजल गुंतवणूकदारांना लागू होणारा १ टक्के कर रद्द करून सरकारने उद्योजकतेलाच प्रोत्साहन दिलं आहे. त्याचबरोबर मुद्रा कर्जाचं प्रमाणही १० लाखांवरून २० लाखांवर आणण्यात आलं आहे,’ याविषयीची माहिती अंकुर जैन यांनी दिली. (Union Budget 2024-25 Analysis)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : हॉकीत भारताची बलाढ्य ऑस्ट्रेलियावर ३-२ ने मात, ५२ वर्षांनंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला हरवलं)

दोन्ही तज्जांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. उपस्थित तरुणांना अर्थसाक्षर करण्याच्या दृष्टीने आयकर विवरणपत्र भरण्याचं महत्त्व आणि गुंतवणुकीचं महत्त्व विषद करून सांगितलं. (Union Budget 2024-25 Analysis)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.