देशातील ‘या’ ३ रेल्वे स्थानकांचा होणार पुनर्विकास

119

देशातील ३ प्रमुख रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यात सुमारे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : ‘भारत जोडो’मध्ये सहभागी व्हा, त्याबदल्यात दसरा मेळाव्यात सहकार्य करू; काँग्रेसचा ‘उद्धवसेने’ला प्रस्ताव)

या ३ स्थानकांचा पुनर्विकास

  1. नवी दिल्ली रेल्वे स्थानक
  2. अहमदाबाद रेल्वे स्थानक
  3. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी), मुंबई

कोणत्याही शहरासाठी रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे आणि केंद्रीय स्थान असते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे रेल्वे स्थानकांच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली आहे. 199 रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम सध्या सुरू आहे. यापैकी 47 रेल्वे स्थानकांसाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी) आणि अहमदाबाद रेल्वे स्थानक या तीन मोठ्या स्थानकांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

या रेल्वे स्थानकांच्या विकासाचे सर्वसामान्य घटक पुढीलप्रमाणे असतील:

  • प्रत्येक स्थानकात किरकोळ दुकाने, कॅफेटेरिया, मनोरंजन सुविधांच्या जागांसह सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी असलेले रुफ प्लाझा असेल.
  • फूड कोर्ट, प्रतीक्षा कक्ष, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील.
  • शहरांच्या अंतर्गत भागात असलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये सिटी सेंटरसारखी जागा असेल.
  • रेल्वे स्थानकांवर रस्ता शोधण्याचे नकाशे/खुणा, ध्वनिव्यवस्था, लिफ्ट/सरकते जिने/ट्रॅव्हलेटर्स असतील.
  • वाहतूक सुलभ होण्यासाठी पुरेशा पार्किंग व्यवस्थेसह बृहद आराखडा तयार करण्यात आला आहे.
  • मेट्रो, बस इत्यादींसारख्या इतर परिवहन सुविधांसोबत एकात्मिकरण करण्यात येईल.
  • सौर उर्जा, जल संवर्धन/पुनर्चक्रीकरण आणि सुधारित वृक्ष आच्छादनासह हरित इमारत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.
  • दिव्यांग स्नेही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष काळजी घेण्यात येईल.
  • इंटेलिजन्ट बिल्डिंगच्या संकल्पनेवर ही स्थानके विकसित करण्यात येतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.