नामिबियासह भारताचा करार, आफ्रिकेतून पुन्हा भारतात 12 ते 14 चित्ते येणार! 

131

मोदी सरकारने नामिबियातून 8 चित्ते भारतात आणले आहेत. सप्टेंबर महिन्यात या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो येथील उद्यानात सोडण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा आफ्रिकेतून आणखी 12 ते 14 चित्ते भारतात आणले जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत दिली.

येत्या 5 वर्षात अफ्रिकेतून लवकरच 12 ते 14 चित्ते भारतात आणण्यात येणार आहे. यासाठी भारत सरकारने नामिबिया सरकारसोबत करारही केला आहे. नुकतेच नामिबियातून 8 चित्ते भारतात आणून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. त्यामध्ये 5 मादी आणि 3 नर चित्त्यांचा समावेश आहे. कुनो येथे रुळल्यानंतर या चित्त्यांनी शिकार करण्यास सुरुवात केली आहे. प्रोजेक्ट टायगर अंतर्गत, भारतात चित्त्यांच्या पुनरागमनासाठी 38.7 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हा प्रकल्प 2021-22 पासून सुरू होऊन 2025-26 पर्यंत चालणार असल्याचे पर्यावरण मंत्री चौबे यांनी सांगितले.

(हेही वाचा – मुंबईच्या रामसर क्षेत्राला शिकारी पक्ष्यांचा धोका, जाणून घ्या नेमके कारण)

पुढे अश्विनीकुमार चौबे असेही म्हणाले, कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेले 8 चित्ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. नामिबियातून भारतात आणल्यानंतर या सर्व चित्त्यांना काही काळ क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. विशेष म्हणजे 16 वनरक्षकांचे पथक या चित्त्यांवर लक्ष ठेऊन आहे. 17 सप्टेंबर रोजी नामिबियातून 8 चित्ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्त्यांना नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. या चित्त्यांना त्यांचे नवीन घर मानवण्यासाठी विशेष तयारीही केली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.