केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या बजेटमध्ये त्या केंद्र सरकारचा आर्थिक लेखाजोखा मांडणार आहेत. अर्थसंकल्पात सर्व क्षेत्रातील घोषणाही करण्यात येतील. रेल्वे खात्यासाठीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री रेल्वे विकासासाठी मोठी घोषणा करु शकतात. एका खासगी वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, बजेटमध्ये 2.0 आणि हायड्रोजनवर धावणा-या ट्रेनसंबंधी मोठी घोषणा होऊ शकते.
रेल्वेच्या अहवालानुसार, बजेटमध्ये 400 ते 500 वंदे भारत ट्रेन आणि 4 हजार नवीन ऑटो मोबाईल कॅरिअर कोचची घोषणा होऊ शकते. यावर्षी मोदी सरकारने बजेटमध्ये भारतीय रेल्वेसाठी 1.9 लाख कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
( हेही वाचा: अनेक सरकारी बॅंकांसाठी महत्त्वाची घोषणा; तुमचेही खाते असेल तर जाणून घ्या सविस्तर )
रेल्वे तिकीटात ज्येष्ठ नागरिकांना सूट?
काही रेल्वे स्टेशन्स हे माॅडर्न केले जाण्याची शक्यता आहे. याठिकाणी विमानतळासारख्या सोयी- सुविधा मिळतील. तुम्ही रेल्वेस्टेशनला आलात की विमानतळावर, असा प्रश्न पडेल. या अर्थसंकल्पात केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटात सवलतीची घोषणा करु शकते. रेल्वे निधीमध्ये नवीन रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी, गेज रेंज, इलेक्ट्रिफिकेशन आणि सिग्नल सिस्टम आधुनिक करण्यासाठी खर्च करण्यात येईल. त्यामुळे रेल्वेचा कायापालट होईल.
अर्थसंकल्पात 400 ते 500 नवीन वंदे भारत ट्रेनची घोषणा?
मोदी सरकार या अर्थसंकल्पात 400 ते 500 नवीन वंदे भारत ट्रेनची घोषणा करु शकतात. त्यामुळे देशातील दळणवळणाला गती मिळेल. कोणत्याही शहरात जाण्यासाठी आता जास्त कालावधी लागणार नाही. या ट्रेनचा वेग 180 किलोमीटर प्रति तास असेल.
Join Our WhatsApp Community