सावधान! पुन्हा ऑक्सिजन अभावी वैद्यकीय आणीबाणी येणार

देशभरात कोरोना संसर्गाची रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ऑक्सिजन अभावी वैद्यकीय आणीबाणी येणार तर नाही न..अशी चिंता सध्या देशाला सतावत आहे. अशा परिस्थितीत केंद्राने राज्यांना पत्र लिहून ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सर्व मुख्य सचिवांना पत्र लिहून आरोग्य सुविधांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

आरोग्य सचिवांनी राज्यांना सूचना देत रुग्णालयांमध्ये 48 तास ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची खात्री करण्यास सांगितले आहे. यासोबतच सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स व्यवस्थित काम करत आहेत, आयसीयू, बीआयपीएपी, एसपीओ 2 प्रणालीसाठी आवश्यक व्हेंटिलेटर योग्य प्रकारे काम करत असल्याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारने राज्यांना कोणते निर्देश दिले

  • सर्व आरोग्य सुविधा रुग्णांची काळजी आणि किमान 48 तास वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरेसा बफर स्टॉक प्रदान करतात
  • सर्व आरोग्य सुविधांमध्ये द्रव वैद्यकीय ऑक्सिजन टाक्या पुरेशा प्रमाणात भरल्या पाहिजेत. रिफिलिंग टाक्यांचा अखंड पुरवठा असावा.
  • सर्व PSA प्लांट परिपूर्ण कार्यरत स्थितीत असावीत, प्लांटच्या देखभालीसाठी सर्व आवश्यक पावले उचलली पाहिजेत
  • सर्व आरोग्य केंद्रांवर पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर असावेत.
  • ऑक्सिजन सिलेंडरमध्ये बॅकअप स्टॉक आणि मजबूत रिफिल सिस्टमची माहिती असणे आवश्यक आहे.
  • लाइफ सपोर्ट उपकरणे उच्च दर्जाच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध असावीत
  • ऑक्सिजन नियंत्रण कक्ष पुन्हा कार्यान्वित करावेत

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here