तर तुला सोडणार नाही… गडकरी कंत्राटदाराला काय म्हणाले होते? वाचा किस्सा

रस्त्याच्या गुणवत्तेविषयी माहिती देताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या पाहणीवेळी केलेल्या एका युक्तीचा किस्सा त्यांनी सांगितला.

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सध्या दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाची पाहणी करत आहेत. त्यासाठी ते विविध राज्यांत फिरुन या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेत आहेत. या पाहणीदरम्यान नितीन गडकरी यांनी जनतेशी संवाद साधत या रस्त्याच्या कामाची माहिती दिली. शुक्रवारी गुजरात राज्यातील भरुच येथे संवाद साधताना त्यांनी रस्त्याच्या गुणवत्तेविषयी माहिती देताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या पाहणीवेळी केलेल्या एका युक्तीचा किस्सा सांगितला.

रस्त्याच्या गुणवत्तेची पाहणी

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाची पाहणी करताना गुरुवारी मध्य प्रदेश येथे मी स्वतः 160 किमी. वेगाने रस्त्याच्या गुणवत्तेची पाहणी केली. निश्चित रुपाने या रस्त्याची गुणवत्ता अत्यंत चांगली असल्याचे लक्षात आले. शुक्रवारीही गुजरातमधील रस्त्याची 120 ते 140 किमी. वेगाने पाहणी केली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची पाहणी करताना रस्त्याची पाहणी करण्यासाठी केलेल्या एका युक्तीचा किस्सा गडकरींनी यावेळी सांगितला.

(हेही वाचाः कोविड काळात गडकरी असे कमावतात दरमहा चार लाख)

अशी केली मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची पाहणी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या गुणवत्तेची पाहणी करण्यासाठी मी गाडीचा वेग 120 किमी. असताना थर्मासमधून चहा प्यायलो. जर का चहा सांडला तर मी तुला सोडणार नाही, असे त्यावेळी मी रस्त्याच्या कंत्राटदाराला सांगितले होते. असा गंमतीदार किस्सा नितीन गडकरी यांनी सांगितला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here