मागच्या दीड-दोन दशकात देशभरातील लग्न समारंभाचे चित्र पालटले आहे. एकेकाळी फक्त दोन कुटुंब, नातेवाईक यांच्या पुरता मर्यादित असायचे. आताची लग्न फक्त शोभेचा, प्रतिष्ठेचा विषय आहेत की काय असे वाटते. दोन जीवांचे मिलनाचे मंत्र राहिले बाजूला, आज कालच्या लग्नात डीजेच्या कर्कश आवाजा पलीकडे काहीच ऐकायला येत नाही. डीजेच्या आवाजामुळे अनेकांना बहिरेपणाची बाधा झाली आहे. डीजेवर कायम स्वरुपी बंदी आणण्यासाठी काहींनी न्यायालयात देखील धाव घेतली आहे. अशा पार्श्वभूमीवर बुलढाण्यात कानठळ्या बसवण्याऱ्या डीजेच्या दणदणाटा शिवाय एक लग्न समारंभ संपन्न झाला आहे.
प्रवाहा विरुद्ध जाण्यासाठी हिंमत लागते. अशी हिंमत बुलढाण्यातल्या एका तरुणाने केली आहे. जेव्हा कोणतेही लग्न डीजेच्या तालावर नाचल्या शिवाय पूर्ण झाले असे मानणे पापा समजले जाते, तेव्हा या तरुणाने लग्नात चक्क टाळ मृदंगाचा जयघोष केला. नांदुरा तालुक्यातील खुर्द येथील साहेबराव रामराव अढाव-पाटील यांचे चिरंजीव आकाश यांनी नंदकिशोर उत्तम मापारी-पाटील यांच्या कन्येशी विवाह केला आहे.
(हेही वाचा – अरे बापरे! एकाच वेळी दिला पाच मुलांना जन्म)
डीजेचा आवाज म्युट
बुलढाण्यातल्या मोताळा तालुक्यात हा आगळा वेगळा लग्न समारंभ संपन्न झाला. या लग्नात नवऱ्याची वरात डीजे, बॅंडवर नाही तर चक्क वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासत टाळ मृदुंगाच्या गजरात काढण्यात आली. चिंचपूर इथल्या या विवाहात जेव्हा नवरदेव टाळ मृदुंगाच्या गजरात आला, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. नवरदेवाची युनिक प्रवेशाची जोरदार चर्चा पंचक्रोशीत होते आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community