राज्यात अनलॉकला सुरुवात… कोणते जिल्हे होणार सुरू?

दुस-या कोरोना लाटेनंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा पहिल्या टप्प्यातील अनलॉक होण्यास आता सुरुवात झाली आहे. ठाकरे सरकारने याबाबतचा निर्णय घेतला असून, याची अंमलबजावणी 4 जूनपासून लागू करण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गुरुवारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पहिल्या टप्प्यांत एकूण 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईला मात्र दिलासा मिळालेला नाही.

काय आहे निर्णय?

 • राज्यात काही ठिकाणी अनलोक.
 • पॉझिटिव्ह रेट 5 टक्के असलेल्या ठिकाणी अनलोक.
 • 18 जिल्ह्यांत पूर्ण अनलोक.
 • ठाणे, औरंगाबाद, जळगाव, वर्धा, लातूर, भंडारा,चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, धुळे, नांदेड, गोदीया, परभणी, गडचिरोली, नाशिक, जालना
 • पहिल्या टप्प्यात बगीचे अनलोक.
 • सरकारी कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू.
 • मॉल्स, हॉटेल, दुकानांना वेळेचे बंधन नाही.
 • लग्न सोहळ्यासाठी 200 माणसांना परवानगी.
 • पहिल्या टप्प्यात जमावबंदी नसेल.
 • क्रिंडागण, खासगी कार्यालये सुरू राहणार.
 • थिएटर, सलून, जिम, शूटिंग आणि कार्यालये सुरू राहणार.
 • पहिल्या टप्प्यात पूर्ण क्षमतेने व्यवहार सुरू राहतील.
 • सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार.
 • लेव्हल-1 मध्ये बस सेवा सुरू राहणार.
 • मुंबई लेव्हल-2 मध्ये असल्याने लोकल सुरू होणार नाही.
 • मुंबईत लोकल बंदच राहणार. रुग्ण कमी झाले तरच सुरू होणार.
 • जर पुढच्या आठवड्यात मुंबई लेव्हल-1 मध्ये आली तर लोकल सुरू होईल.
 • ज्या जिल्ह्यांत ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाइड आहेत, अशा जिल्ह्यांत संपूर्ण अनलॉक होईल.
 • यामध्ये रेस्टॉरंट, मॉल, नियमित दुकानं किंवा ट्रेन देखील सुरू होतील.
 • जिल्हे आणि महानगर पालिकांचे धरुन एकूण ४३ भाग पाडले आहेत.
 • दर आठडव्यात बदल होत राहणार.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here